सैफ अली खान लिहितोय आत्मचरित्र, पण बेबोला का वाटतेय भीती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 18:26 IST2020-09-07T18:26:01+5:302020-09-07T18:26:25+5:30
सैफचे आत्मचरित्र वाचायला मिळणार म्हणून खरे तर त्याचे चाहते उत्सुक आहेत. पण बेगम करिना कपूर मात्र मनातून घाबरली आहे.

सैफ अली खान लिहितोय आत्मचरित्र, पण बेबोला का वाटतेय भीती?
बॉलिवूडचा नवाब म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सैफ अली खान लेखक बनला आहे. होय, सैफ आत्मचरित्र लिहितोय. त्याने लिहिलेले आत्मचरित्र पुढीलवर्षी ऑक्टोबरमध्ये चाहत्यांना वाचता येणार आहे. सैफचे आत्मचरित्र वाचायला मिळणार म्हणून खरे तर त्याचे चाहते कमालीचे उत्सुक आहेत. पण बेगम करिना कपूर मात्र मनातून घाबरली आहे. सैफ आत्मचरित्र लिहिणार म्हटल्यावर तिने वेगळाच धसका घेतला आहे.
फिल्म क्रिटिक्स अनुपमा चोप्रासोबतच्या एका मुलाखतीत बेबो यावर बोलली. ती म्हणाली, सैफ आत्मचरित्र लिहिणार हे कळताच मला भीती वाटू लागलीये. याचे कारण म्हणजे, सैफचा बेधडकपणा. तो आपले मत अगदी न घाबरता, बेधडकपणे मांडतो. त्यामुळे तो कुठल्या वादात अडकू नये, असे मला वाटतेय. तो वादात अडकेल, याची मला भीती आहे. तुझे पुस्तक प्रकाशित होण्याआधी सर्वप्रथम मी वाचेल, असे मी त्याला म्हणालेही होते.
सैफचे आत्मचरित्र हार्पर कॉलिंस इंडियामार्फत प्रकाशित केले जाणार आहे. कुटुंब, घर, यश, अपयश, प्रेरणा, चित्रपट अशा अनेक गोष्टी सैफ या आत्मचरित्रात उलगडणार आहे. आजपर्यंत कधीही जगासमोर आले नाहीत असे सैफच्या पर्सनल आयुष्यातील काही किस्सेही या आत्मचरित्रात वाचायला मिळतील, अशी अपेक्षा आहे.
करिना कपूर लवकरच ‘लाल सिंग चड्ढा’ या सिनेमात झळकणार आहे. यात करिना आमिर खानसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. तूर्तास करिना प्रेग्नंसी एन्जॉय करतेय़ लवकरच बेबो दुस-यांदा आई बनणार आहे. अलीकडे करिनाने खुद्द ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.