OMG: करिना कपूर खानने जाहिरात करण्यासाठी घेतले 11 कोटींचे मानधन !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 17:19 IST2019-04-02T17:14:32+5:302019-04-02T17:19:44+5:30
ता करिना कपूरने सिनेमाच्या मानधनाप्रमाणेच जाहिरातींसाठीचे मानधनही वाढवले आहे.

OMG: करिना कपूर खानने जाहिरात करण्यासाठी घेतले 11 कोटींचे मानधन !
हिंदी चित्रपटसृष्टीतील बेगम म्हणजेच करीना कपूर खान… छोटे नवाब सैफची बेगम होण्याआधीपासूनच करीना आपली फॅशन आणि स्टाईलबाबत बरीच सजग आहे. ती कुठल्याही कार्यक्रमात जाते तिथे आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने साऱ्यांच्याच नजरा आकर्षित करून घेते. रिल लाईफ असो किंवा रिअल बेबोच्या स्टाईलवर सारेच फिदा असतात. म्हणूनच तिची लोकप्रियता इनकॅश करण्यासाठी बड्या जाहिरात कंपनी तिला साईन करण्यासाठी उत्सुक असतात.
आता करिना कपूरने सिनेमाच्या मानधनाप्रमाणेच जाहिरातींसाठीचे मानधनही वाढवले आहे. करिना कपूरला जर कोणत्या जाहीरातीची ऑफर द्यायची असेल तर चक्क 11 कोटी मोजावे लागणार आहे. नुकतेच एका जाहिरात कंपनीने तिला 11 कोटी मानधन देवून तिच्यासह 1 वर्षाचा करार केला आहे. या 11 कोटींमध्ये करिना प्रोमोशूट आणि प्रमोशनही करणार आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार या जाहिरात कंपनीने करिनाला एका वर्षासाठी ब्रांड एंबेसडरही बनवले आहे.
आतापर्यंत जाहिरातीसाठी अभिनेत्रींमध्ये करिनाही सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असावी कारण, इतर अभिनेत्री जाहिरातीसाठी जवळपास 5 ते 6 कोटी इतके मानधन आकारतात. करिनाच्या 18 वर्षाच्या करिअरमध्ये 15 हून अधिक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये ती झळकली आहे. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर अभिनेत्रींची लोकप्रियता कमी होते असे समीकरण खोडून काढत करिना लग्नानंतर अधिक लोकप्रिय ठरली. इतकेच नाही तर तिचा प्रेग्नंसीमध्ये ती अधिक ग्लॅमरस अभिनेत्री बनली ठरली होती.
करिना कपूर सध्या अक्षय कुमार सोबत 'गुड न्यूज' या सिनेमाचे शूटिंग करत असून ती या सिनेमानंतर 'तख्त' या सिनेमाच्या शूटिंगलासुरुवात करणार आहे. या सिनेमात आलिया भट्ट, भूमि पेडनेकर, अनिल कपूर आणि जाह्नवी कपूरही झळकणार आहे. या सिनेमाची कथा ही मुघल काळातील असून या सगळ्याच कलाकार एका वेगळ्या रूपात रसिकांना पाहायला मिळणार आहे.