प्रेग्नंसीनंतर फिट राहण्यासाठी करिना कपूरने असा आखला डाएट प्लॅन,तैमुरच आहे दोघांसाठी पहिली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 17:33 IST2017-02-20T12:03:23+5:302017-02-20T17:33:23+5:30

गरोदरपणात नॉर्मल डिलेव्हरी व्हावी यासाठी महिला खूप व्यायाम किंवा वेगवेगळ्या गोष्टी करतण्यात बिझी दिसतात. सतत अॅक्टीव्ह राहिल्याने नॉर्मल डिलेव्हरी ...

Kareena Kapoor is the first Diet Plan to stay fit after the pregnancy; | प्रेग्नंसीनंतर फिट राहण्यासाठी करिना कपूरने असा आखला डाएट प्लॅन,तैमुरच आहे दोघांसाठी पहिली जबाबदारी

प्रेग्नंसीनंतर फिट राहण्यासाठी करिना कपूरने असा आखला डाएट प्लॅन,तैमुरच आहे दोघांसाठी पहिली जबाबदारी

ोदरपणात नॉर्मल डिलेव्हरी व्हावी यासाठी महिला खूप व्यायाम किंवा वेगवेगळ्या गोष्टी करतण्यात बिझी दिसतात. सतत अॅक्टीव्ह राहिल्याने नॉर्मल डिलेव्हरी होण्यास मदत होते असे म्हटले जाते. सध्या बॉलिवूडमध्ये करिना कपूर या ग्लॅमसर मॉमने सा-यांचे लक्ष आपल्याकडे वेधल्याचे पाहायला मिळतेय. तैमुरला या गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर अगदी काही दिवसानंतरच करिना घराबाहेर पडली. सुरूवातीला वजन वाढलेली करिनाने पुन्हा योग्य डाएट प्लॅन करत स्वत:ला योग्यरितीने मेंटेन केल्याचे पाहयला मिळतंय.सध्या करिना आपल्या जेवणात बाजरीच्या भाकरीसोबत एक वाटी भाजी, तूप आणि गुळ करीनाच्या डाएटमध्ये आहे. मसुरची डळ, राजमा आणि छोले करीनाचे आवडते पदार्थ आहेत. इतकेच नाही तर भूक लागल्यास करीना एक वाटी खिचडीसुद्धा जेवणात घेतेय. रात्रीच्या वेळी टीव्ही बघताना ती एक मोठा ग्लास दुध घेते. दूध घेत ती स्वत:चा डाएट प्लॅन असा आखला आहे.

प्रेग्नंसीदरम्यानच्या काही खास गोष्टीही तिने शेअर केल्या आहेत. प्रेग्नंसीचे दिवस मी खूप एंन्जॉय केले आहेत. त्यावेळी पराठे आणि पिझ्झावर ताव मारायची असल्याचे करिना सांगितले. आता माझ्या पेक्षा मला तैमुरवर जास्त लक्ष द्यायचे आहे. त्याची काळजी घेणे माझी पहिली प्रायोरीटी आहे. नेहमी  तैमूरजवळ आमच्या दोघांपौकी एकाने तरी सोबत रहावे या निर्णयावर आम्ही दोेघेही ठाम आहोत. जेव्हा सैफ बाहेर असतो, तेव्हा मी तैमूरची काळजी घेते. आता मी इंटरव्ह्यू देते असले तरीही सैफ तैमूरची काळजी घेतोय. तैमुर ही एकाची जबाबदारी नसून दोघांचीही जबाबदारी आहे त्यानुसार सैफने त्याची एक मीटिंगही पुढे ढकलली आहे. भविष्यात  कामामुळे तैमुरजवळ दोघांनाही थांबता येणे अशक्य झाल्यास मी त्याला माझ्यासोबत शूटिंगलाही घेऊन जाईन पण त्याला एकटे सोडणार नाही असे सांगत यासह अनेक खास गोष्टी करिनाने शेअर केल्या. 

Web Title: Kareena Kapoor is the first Diet Plan to stay fit after the pregnancy;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.