सासूबाईं शर्मिला टागोर यांना 'या' खास अंदाजात करिनाने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 14:25 IST2020-12-08T14:22:27+5:302020-12-08T14:25:29+5:30

करिना कपूरने तिच्या सासूबाईंना सर्वात खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

Kareena Kapoor Extends Birthday Wishes To 'Beautiful' Sharmila Tagore | सासूबाईं शर्मिला टागोर यांना 'या' खास अंदाजात करिनाने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...

सासूबाईं शर्मिला टागोर यांना 'या' खास अंदाजात करिनाने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा...

बॉलिवूडच्या एकेकाळच्या टॉपच्या अभिनेत्री आणि सैफ अली खानची आई शर्मिला टागोर यांचा आज वाढदिवस. शर्मिला टागोर या त्यांचा ७६ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांना त्याच्या फॅन्ससोबतच सून करिना कपूरसह अनेक नातेवाईकांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. करिना कपूरने तिच्या सासूबाईंना सर्वात खास अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

करिना कपूरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर सासूबाई शर्मिला टागोर यांचा एक थ्रोबॅक फोटो शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत शर्मिला टागोर फारच तरूण आणि सुंदर दिसत आहेत. हा फोटो शेअर करत करिनाने कॅप्शनही दिलं आहे की, 'एक फारच शांत आणि मजबूत महिला, ज्यांना मी ओखळते. वाढदिवसाच्या शुभेच्छा सासूबाई'. करिनाने शेअर केलेल्या या पोस्टवर लोक भरभरून लाइक देत आहेत.(शर्मिला टागोर यांच्या बिकिनी शूटने उडाली होती खळबळ, नातं वाचवण्यासाठी केलं होतं 'हे' काम)

 

शर्मिला टागोर यांनी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार दिवंगत नबाव मंसूर अली खान पतोडी यांच्यासोबत लग्न केले होते. जेव्हा त्यांनी लग्न केलं तेव्हा त्यांचं करिअर शिखरावर होतं. पण त्यांनी ते सोडलं. आजही त्यांच्या कामाची आठवण काढली जाते. शर्मिला या बॉलिवूडमध्ये बिकिनी घालणाऱ्या पहिल्या अभिनेत्री आहे. त्यांनी बिकिनी घालून सगळीकडे खळबळ उडवून दिली होती. इतकेच काय तर त्यांच्या बिकिनीवरून संसदेतही गोंधळ झाला होता.
 

Web Title: Kareena Kapoor Extends Birthday Wishes To 'Beautiful' Sharmila Tagore