"करीनाने नव्हता सोडला 'कहो ना प्यार है', तर तिला...", अमिषा पटेलचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 12:28 IST2025-01-15T12:27:37+5:302025-01-15T12:28:45+5:30

Ameesha Patel : अमिषा पटेल आणि हृतिक रोशनने 'कहो ना प्यार है' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अमिषाच्या जागी आधी करीना कपूरची निवड करण्यात आली होती.

"Kareena Kapoor didn't leave 'Kaho Na Pyaar Hai', she...," Ameesha Patel's shocking revelation | "करीनाने नव्हता सोडला 'कहो ना प्यार है', तर तिला...", अमिषा पटेलचा धक्कादायक खुलासा

"करीनाने नव्हता सोडला 'कहो ना प्यार है', तर तिला...", अमिषा पटेलचा धक्कादायक खुलासा

'गदर', 'हमराज', 'भूल भुलैया' आणि 'गदर २' सारखे दमदार आणि हिट चित्रपट देणाऱ्या अमिषा पटेल(Amisha Patel)ने २००० मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक राकेश रोशन (Rakesh Roshan) यांच्या 'कहो ना प्यार' (Kaho Na Pyar Hai) या चित्रपटात काम केले होते, हे सर्वांनाच माहीत आहे. त्यांचा मुलगा हृतिक रोशन(Hritik Roshan)नेही याच चित्रपटातून पदार्पण केले. या दोघांचा हा पहिलाच चित्रपट होता आणि बॉक्स ऑफिसवरही तो खूप गाजला होता.

नुकतेच अमिषाने या चित्रपटाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, करीना कपूर या चित्रपटातून पदार्पण करणार होती, पण शूटिंग अर्धवट राहिल्यानंतर तिला हा चित्रपट सोडावा लागला. अमिषाने सांगितले की, राकेश रोशन यांनीच करीनाला चित्रपट सोडण्यास सांगितले होते. करीना कपूरनेही त्याच वर्षी अभिषेक बच्चनसोबत 'रिफ्युजी'मधून पदार्पण केले होते. आई बबितामुळे करीनाने 'कहो ना प्यार है' सोडल्याचे बोलले जात होते.

चित्रपटाबद्दल अमिषाचा खुलासा
आता अमिषा पटेलने सांगितलेले सत्य काही वेगळेच आहे. अमिषाने तिच्या लेटेस्ट मुलाखतीत सांगितले की, करीना कपूरने 'कहो ना प्यार है' हा चित्रपट स्वतः सोडला नव्हता, परंतु तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते. या निर्णयाबद्दल चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन यांनी तिला काय सांगितले होते याचा खुलासाही अमिषाने केला. बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अमिषा म्हणाली, 'करीनाने स्वतः चित्रपट सोडला नाही. राकेशजींनी तिला बाहेर काढले होते.

'करीनाला राकेशजींनी काढले होते' - अमिषा
अमिषा म्हणाली, 'राकेश जींनी त्यांना सांगितले होते की त्यांच्यात आणि करीनामध्ये काही मतभेद आहेत, त्यामुळे त्यांनी करीनाला चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. राकेश रोशन यांची पत्नी आणि हृतिकची आई पिंकी आंटी चिंतेत होत्या, कारण चित्रपटाचा सेट तयार होता आणि तीन दिवसांत सोनियाच्या भूमिकेसाठी नवीन चेहरा शोधावा लागला. अमिषाने सांगितले की, ''त्या चित्रपटाचा सेट तयार करण्यासाठी करोडो रुपये खर्च झाले. हृतिकचा हा पहिलाच चित्रपट होता. त्यामुळे प्रत्येकजण प्रचंड तणावाखाली होता.''

या चित्रपटाने पटकावले सर्वाधिक पुरस्कार 
अमिषा पुढे म्हणाली, 'तेव्हा पिंकी आंटीने मला सांगितले की, राकेश जी यांनी मला लग्नात पाहिले होते. त्या रात्री ते झोपू शकले नाहीत आणि त्यांनी आपली सोनिया सापडल्याचे सांगितले. त्यांच्या चित्रपटाला मी 'हो' म्हणेन, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कहो ना प्यार है हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच हिट झाला होता. इतकेच नाही तर या चित्रपटाने विविध श्रेणींमध्ये एकूण ९२ पुरस्कार जिंकून इतिहास रचला. या कारणास्तव त्याचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे.

 

Web Title: "Kareena Kapoor didn't leave 'Kaho Na Pyaar Hai', she...," Ameesha Patel's shocking revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.