'ही' अभिनेत्री बनली UNICEF ची नॅशनल ब्रँड ॲम्बेसेडर; भावूक होत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 12:31 IST2024-05-05T12:28:42+5:302024-05-05T12:31:01+5:30

बॉलिवूडची 'बेबो अर्थात करिना कपूर. करिना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनात घर केलं. बॉलिवूडची ‘पॉव्हरफूल’ अभिनेत्री ...

Kareena Kapoor Becomes UNICEF's National Brand Ambassador | 'ही' अभिनेत्री बनली UNICEF ची नॅशनल ब्रँड ॲम्बेसेडर; भावूक होत म्हणाली...

'ही' अभिनेत्री बनली UNICEF ची नॅशनल ब्रँड ॲम्बेसेडर; भावूक होत म्हणाली...

बॉलिवूडची 'बेबो अर्थात करिना कपूर.करिना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये काम करत चाहत्यांच्या मनात घर केलं. बॉलिवूडची ‘पॉव्हरफूल’ अभिनेत्री म्हणून करिना कपूर हिची ओळख आहे.  करिना कपूर आता महत्त्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. अभिनेत्री आता युनिसेफची नॅशनल ॲम्बेसिडर झालेली आहे.

करिना कपूर चित्रपटसृष्टीत महत्त्वाचं योगदान देण्यासोबतच सामाजिक प्रश्नांवरही काम करताना दिसते. गेल्या १० वर्षांपासून म्हणजेच २०१४ पासून अभिनेत्री युनिसेफसोबत काम करत आहे.  आता ती युनिसेफची नॅशनल ॲम्बेसिडर झाली आहे. नॅशनल ॲम्बेसेडर बनल्यानंतर करिना भावूक झाली.  एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांना यासंदर्भात माहिती दिली आहे. पोस्टमध्ये करिनानं युनिसेफच्या कामाचं कौतुक केलं आणि नॅशनल ॲम्बेसेडर हा सन्मान मिळाल्याने मी खूप आनंदी असल्याचं तिनं सांगितलं. 

ती म्हणाली, 'आजचा दिवस खूपच खास आहे. दहा वर्षांपुर्वी सुरू झालेला हा प्रवास खूपच सुंदर राहिला आहे. युनिसेफसोबत केलेल्या कामाचा मला सार्थ अभिमान आहे. मुलांच्या हक्कांसाठी आणि भविष्यासाठी  त्यांचा आवाज बनून मी कायम काम करत राहिलं.  तसेच देशभरातील महिला आणि मुलांच्या हक्कांसाठी अथक प्रयत्न करणाऱ्या संपूर्ण टीमचे विशेष आभार. गेल्या  75 वर्षापासून भारतातील मुलांसाठी  केलेल्या अविश्वसनीय कामासाठी UNICEF इंडियाचंही अभिनंदन. लहान मुलांच्या हक्कासाठी कटीबद्ध राहिल'.

करिनाच्या फिल्म इंडस्ट्रीमधील वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर नुकतेच ती  'क्रू' या सिनेमात झळकली. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 'सिंघम रिटर्न्स'मध्ये दिसलेली करिना कपूर खान आता 'सिंघम अगेन'मधून पुन्हा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. यासोबतच करिना ही केजीएफ फेम यशसोबत 'टॉक्सिक' या चित्रपटातून साउथ सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करणार होती. पण, आता या चित्रपटातून बाहेर पडल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Kareena Kapoor Becomes UNICEF's National Brand Ambassador