त्या घटनेनंतर करीना कपूर आणि अमृता सिंग कधीच आल्या नाहीत समोरासमोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 18:29 IST2024-02-08T18:25:37+5:302024-02-08T18:29:39+5:30
Amruta Singh And Kareena Kapoor : अमृता सिंग आणि करीना कपूर खान देखील एकमेकांना भेटल्या असल्याचं फार कमी लोकांना ठाऊक आहे.

त्या घटनेनंतर करीना कपूर आणि अमृता सिंग कधीच आल्या नाहीत समोरासमोर
८०च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत अमृता सिंग(Amruta Singh)चाही समावेश होता. अमृता ९ फेब्रुवारीला तिचा वाढदिवस साजरा करणार आहे. १९८३ साली बेताब चित्रपटातून आपल्या करिअरची सुरूवात करणाऱ्या अमृताने मर्द, चमेली की शादी, खुदगर्ज यासारख्या सुपरहिट सिनेमात काम केले. एक काळ होता जेव्हा या अभिनेत्रीचे नाव चर्चेत असायचे. मात्र आता ती सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली आहे.
चित्रपटांशिवाय अमृता सिंग पर्सनल लाइफमुळे खूप चर्चेत आली होती. अमृता सिंगचे सैफ अली खानसोबतचे नाते खूप चर्चेत होते. त्यांचे लग्न असो किंवा घटस्फोट, त्यांचे बिघडलेले नाते कुणापासून लपलेले नाही. मात्र, आता दोघांनीही आपापल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. अमृता सिंग आणि करीना कपूर खान देखील एकमेकांना भेटल्या असल्याचं फार कमी लोकांना ठाऊक आहे.
जेव्हा अमृता करिनाला भेटण्यासाठी सेटवर पोहोचली...
२००१ मध्ये रिलीज झालेल्या करण जोहरचा सुपरहिट चित्रपट 'कभी खुशी कभी गम'च्या शूटिंगदरम्यान ही घटना घडली होती. खुद्द करिनाने 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये याचा खुलासा केला होता. तिने सांगितले होते की सारा अली खान माझी खूप मोठी फॅन आहे. तिला माझे 'पू' पात्र खूप आवडले. चित्रपटाच्या ट्रायल दरम्यान ती तिची आई अमृतासोबत मला भेटायला आली होती. ती अमृताच्या मागे लपली होती. अमृताची इच्छा होती की मी सारासह फोटो क्लिक करावे.
करीना सैफच्या मुलांसोबत असे आहे बॉण्डिंग
करीना अमृतासोबतच्या तिच्या बॉन्डबद्दल पुढे म्हणाली की, 'आम्ही एका कुटुंबासारखे आहोत.' मात्र, करिनाची अमृताला भेटण्याची ही पहिली आणि शेवटची वेळ होती. पण अमृताची दोन्ही मुले सारा आणि इब्राहिम खानसोबत करिनाचे खूप चांगले संबंध आहेत. अभिनेत्री सोशल मीडियावर सैफच्या सर्व मुलांसोबतचे फोटो शेअर करत असते.