करीना आणि सैफ अली खानची पतौडी पॅलेस आहे खूप आलिशान, पहा Inside Photos

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 16:30 IST2021-03-19T16:28:34+5:302021-03-19T16:30:57+5:30

पतौडी पॅलेसला ८१ वर्षे झाली आहेत आणि याची किंमत ८०० कोटी रुपये आहे.

Kareena and Saif Ali Khan's Pataudi Palace is very luxurious, see Inside Photos | करीना आणि सैफ अली खानची पतौडी पॅलेस आहे खूप आलिशान, पहा Inside Photos

करीना आणि सैफ अली खानची पतौडी पॅलेस आहे खूप आलिशान, पहा Inside Photos

बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहे जे खूप साधारण कुटुंबातील आहेत आणि सिनेइंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख बनवली आहे. मात्र असे काही कलाकार आहेत जे खूप श्रीमंत आहेत, मात्र त्यांनी बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्यावर यश संपादन केले आहे. या कलाकारांमधील एक अभिनेता म्हणजे सैफ अली खान. त्याने बरेच हिट चित्रपट दिले आहेत आणि त्याची पत्नी अभिनेत्री करीना कपूरदेखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. दोघेही लक्झरी आयुष्य जगतात. त्यांचे पतौडी पॅलेस खूप आलिशान आहे.


खरेतर सैफ अली खान बॉलिवूडचा एक मात्र अभिनेता आहे ज्याच्या नावावर आलिशान महल आहे. एका मुलाखतीत सैफने सांगितले की, या महलसाठी त्याला खूप मोठी रक्कम मोजावी लागली होती. त्याने सांगितले होते की, त्याचे वडील मंसूर अली खान पतौडी यांच्या निधनानंतर हे पॅलेस भाड्याने दिले होते. मात्र ते परत मिळवण्यासाठी त्यांना खूप मोठी रक्कम द्यावी लागली होती.


हे पतौडी हरियाणातील गुडगावपासून २६ किलोमीटरच्या अंतरावर आहे. हे पॅलेस इब्राहिम कोठीच्या नावाने ओळखले जाते. हे पॅलेस खूप मोठे आणि आलिशान आहे. 


या पतौडी पॅलेसला ८१ वर्षे झाली आहेत आणि याची किंमत ८०० कोटी रुपये आहे.


हे पतौडी पॅलेस जवळपास १० एकरमध्ये वसले आहे आणि यात १५० खोल्या आहेत. ज्यात सात ड्रेसिंग रूम, सात बेडरूम, सात बिलियर्ड रूम, महलनुमा ड्रॉइंग रूम आणि डायनिंग रुमचा समावेश आहे.


या पतौडी पॅलेसची निर्मिती १९३५ साली आठवे नवाब आणि भारतीय टीमचे माजी कर्णधार इफ्तिखार अली हुसैन सिद्दीकी यांनी केली होती.


सर्वांना माहित आहे की दिल्लीचे हृदय म्हणजेच कनॉट प्लेसला रॉबर्ट रसेलने डिझाइन केले होते.

मात्र तुम्हाला माहित नसेल की १९०० सालच्या सुरूवातीली रसेलने पतौडी पॅलेस डिझाइन केले होते.

 

या पॅलेसमध्ये मोठे मोठे काही ग्राउंड, गॅरेज, घोड्यांचे तबेले आहेत. सोबतच कित्येक महागडे पेटिंग्स, वस्तू आणि अँटिक गोष्टी आहेत.


सैफ आणि करीना तैमूरसोबत बऱ्याचदा या पतौडी पॅलेसमध्ये वेळ व्यतित करण्यासाठी जातात. तिथे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जातात.

Web Title: Kareena and Saif Ali Khan's Pataudi Palace is very luxurious, see Inside Photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.