करणचा माफीनामा : ‘यानंतर पाक कलावंतांसोबत चित्रपट नाही’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2016 15:43 IST2016-10-18T20:46:27+5:302016-10-19T15:43:22+5:30
यानंतर मी पाकिस्तानी कलावंतांसोबत काम करणार नाही असे करण जोहरने जाहीर केले आहे. माझ्यावर टीका केली जात आहे, मला भारताचा नागरिक असल्याचा अभिमान आहे. देश माझ्यासाठी प्रथमस्थानीच आहे असे सांगून त्याने आपल्या चित्रपटाचा विरोध करू नये अशी विनंती केली आहे.
.jpg)
करणचा माफीनामा : ‘यानंतर पाक कलावंतांसोबत चित्रपट नाही’
ही विनंती करणारा व्हिडीओ करणने यूट्युबवर पोस्ट केला आहे. यात तो म्हणतो, ‘गतवर्षी ‘ऐ दिल है मुश्किल’ची शूटिंग सुरू केली होती, तेव्हा शेजारी देशासोबतचे आपले संबध आजच्या तुलनेत चांगले होते. भारताने आरंभलेल्या शांतीच्या प्रयत्नांना मी देखील पाठिंबा दिला होता. मात्र आजची स्थिती वेगळी आहे. ‘ऐ दिल है मुश्किल’च्या निर्मितीमध्ये 300 लोकांचा सहभाग आहे. त्यांची यात कोणतीही चूक नाही. हा चित्रपट प्रदर्शित होऊ द्या. मी भारतीय सैन्याचा आदर करतो. मी त्यांना सॅल्यूट करतो. दहशतवादाचे कुठल्याच स्थितीत समर्थन केले जाऊ शकत नाही. दहशतवाद नेहमीच निंदनीय आहे.
पाकी कलाकारांवरील बंदीच्या मुद्यावर अनेक दिवसांपासून मी मौन बाळगून होतो. पण मी राष्ट्रविरोधी आहे, असा या मौनाचा अर्थ काढला गेला. मी या आरोपाने मी आतून दुखावलो गेलो.’
याच महिन्यात ‘ऐ दिल है मुश्किल’ प्रदर्शित होत आहे. मात्र त्याआधी ‘सिनेमा ओनर्स एक्झीबिटर्स असोसिएशन आॅफ इंडिया’च्या सदस्य असलेल्या सिंगल स्क्रिन थेअटरच्या मालकांनी हा चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याचा निर्णय घेतला होता. यामुळे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व गोवा या राज्यातील सिंगल स्क्रिन थेअटर्समध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन होणार नसल्याचे सांगण्यात आले होते. या चित्रपटात पाकिस्तानी कलावंत फवाद खान याची भूमिका असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते.
करणने पोस्ट केलेला व्हिडीओ म्हणजे माफीनामा मानावी की त्याची बाजू हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण काहीही असो ‘देर आये दुरुस्त आये’ असेच करणच्या बाबतीत म्हणावे लागेल.
करणने पोस्ट केलेला व्हिडीओ म्हणजे माफीनामा की त्याची बाजू हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, पण काहीही असो ‘देर आये दुरुस्त आये’ असेच करणच्या बाबतीत म्हणावे लागेल. ‘ऐ दिल है मुश्किल’मध्ये रणवीर कपूर, ऐश्वर्या रॉय, अनुष्का शर्मा यांच्या प्रमुख भूमिका आहेत.