बाळाच्या जन्माआधीच करिनाने सुरू केले सेलिब्रेशन... पाहा कसे केले करिनाने सेलिब्रेशन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2016 10:41 IST2016-12-18T19:41:04+5:302016-12-19T10:41:13+5:30

अभिनेत्री करिना कपूरच्या प्रसूतीस अवघे काही दिवस उरले असले तरी ती प्रत्येक क्षणाचा आनंद लुुटताना दिसतेय. अमृता अरोराने आयोजित ...

Karan started celebrity before child's birth ... See how Kareena celebrated ... | बाळाच्या जन्माआधीच करिनाने सुरू केले सेलिब्रेशन... पाहा कसे केले करिनाने सेलिब्रेशन...

बाळाच्या जन्माआधीच करिनाने सुरू केले सेलिब्रेशन... पाहा कसे केले करिनाने सेलिब्रेशन...

िनेत्री करिना कपूरच्या प्रसूतीस अवघे काही दिवस उरले असले तरी ती प्रत्येक क्षणाचा आनंद लुुटताना दिसतेय. अमृता अरोराने आयोजित केलेल्या ख्रिसमसपूर्व बॅशमध्ये ती सहभागी झाली होती.



प्रसूतीदरम्यान ख्रिसमसचा उत्सव साजरा करता येणार नसल्याची शंका असल्याने करिनाने ख्रिसमपूर्व पार्टीत सहभागी होऊन हा आनंद लुटला. येत्या २० डिसेंबर किंवा आसपासच्या तारखेला तिची प्रसूती होईल, अशी अपेक्षा आहे. ख्रिसमस ट्रीच्या बॅकड्रॉपमध्ये करिना, मलायका अरोरा तिची बहीण अमृता यांच्यासह आनंद लुटतानाचे चित्र अमृता अरोराने इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध केले आहे. या वेळी करिनाची बहीण करिश्मा छायाचित्रात दिसत नाही.



‘ख्रिसमस टायडिंग’ या फोटोओळीखाली अमृताने हे छायाचित्र इन्स्टावर प्रसिद्ध केले आहे. करिना, करिष्मा आणि आई बबिता या दरवर्षी ख्रिसमस साजरा करतात. यामध्ये करिनाची आजी कृष्णा राज कपूर यांच्यासह कपूर खानदानमधील सर्वच जण सहभागी होतात.
बाळंतपणातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेण्याचा प्रयत्न करिना कपूरने केला आहे. करिना आणि सैफ यांचे हे पहिलेच मुल असल्याने दोन्ही कुटुंबियांकडून करिनाची काळजी घेतली जात आहे. करिनानेही बाळंतपणाचे फारसे ओझे न घेता हा प्रत्येक महिलेच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. ही राष्ट्रीय आपत्ती नसल्याचे सडेतोड मत व्यक्त केले होते. 

Web Title: Karan started celebrity before child's birth ... See how Kareena celebrated ...