​करन कुंद्राच्या ‘या’ व्हिडिओने घातलाय धुमाकूळ !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2016 14:30 IST2016-08-28T09:00:06+5:302016-08-28T14:30:06+5:30

छोट्या पडद्यावरील सर्वात हॉटेस्ट अभिनेता म्हणून ज्याची ओळख आहे.....

Karan Kundra's 'This Video' | ​करन कुंद्राच्या ‘या’ व्हिडिओने घातलाय धुमाकूळ !!

​करन कुंद्राच्या ‘या’ व्हिडिओने घातलाय धुमाकूळ !!


/>छोट्या पडद्यावरील सर्वात हॉटेस्ट अभिनेता म्हणून ज्याची  ओळख आहे, त्या करण कुंद्राच्या एका व्हिडिओने यूट्यूबसह सोशल मीडियावर मोठी धुमाकूळ घातली आहे. हॉट सीन आणि उत्तम संगीतबद्ध गाणे यामुळे हा व्हिडिओ अक्षरश: वाºयासारखा व्हायरल होत आहे.  ‘दो चार दिन...’ या गाण्याचा हा व्हिडीओ रिलीज झाला असून, यूट्यूबवर व्हिडीओ पाहण्यासाठी नेटिझन्सनी गर्दी केली आहे. आतापर्यंत ४८लाखांहून अधिक हिट्स या व्हिडीओला आहेत.
या गाण्यात अभिनेत्री रुही सिंहसोबत करण कुंद्राचे हॉट सीन असून, अत्यंत रोमँटिक असं गाणं आहे. या गण्यात दाखवलंय की, करणचं ब्रेकअप होतं. त्यानंतर तो नाराज असतो. मात्र, काही दिवसांनंतर त्याच्या आयुष्यात रुही येते आणि मग करण पुन्हा प्रेमात पडतो.
संगीतकार जीत गांगुलींनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं गायक राहुल वैद्यने गायलं असून, मनोज मुंताशिर यांचे शब्द आहेत.

Web Title: Karan Kundra's 'This Video'