​करण जोहरच्या पार्टीत दिसला करिना कपूरचा बोल्ड अवतार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2017 09:59 IST2017-04-10T04:29:23+5:302017-04-10T09:59:23+5:30

बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे. त्यामुळेच तिला फॉलो करणारेही अनेक आहे. पण काल-परवाचा करिनाचा अंदाज पाहिल्यावर ...

Karan Kapoor's bold avatar in Karan Johar's party! | ​करण जोहरच्या पार्टीत दिसला करिना कपूरचा बोल्ड अवतार!

​करण जोहरच्या पार्टीत दिसला करिना कपूरचा बोल्ड अवतार!

लिवूड अभिनेत्री करिना कपूरचा फॅशन सेन्स जबरदस्त आहे. त्यामुळेच तिला फॉलो करणारेही अनेक आहे. पण काल-परवाचा करिनाचा अंदाज पाहिल्यावर तुम्हीही तिच्या फॅशनचे चाहते व्हाल. होय, आम्ही बोलतोय ते करण जोहरच्या लेटनाईट पार्टीतील करिनाच्या हॉट अवताराबद्दल. करणने बॉलिवूडच्या यंग ब्रिगेडसाठी एका पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा, मनीष मल्होत्रा, मलायका अरोरा, अमृता अरोरा, श्रीदेवीची मुलगी जान्हवी, जॅकलिन फर्नांडिस असे सगळे जण दिसले. याशिवाय करिना आणि तिचा लाडका हबी सैफ अली खान हे दोघेही या पार्टीला पोहोचले. यावेळी करिना ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसली.





तिच्या या आऊटफिटमध्ये सगळ्यात वेगळे काय होते तर तिचे स्टाईलिश ब्लॅकलेस टॉप. या ब्लॅकलेस टॉपवर मोकळे केस,  फुटविअरमध्ये ब्लॅक कलर हाय हिल्स सँडल, क्लचसोबत स्लिंग चेन आणि हलकाचा मेकअप अशा अतिशय साध्या पण सुंदर स्टाईलमध्ये करिना या पार्टीत आली. निश्चितपणे करिनाने या पार्टीत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.



तैमूरच्या जन्मानंतर आता करिनाने कामावर परतण्याची तयारी चालवली आहे. प्रेग्नंसीदरम्यान वाढलेले वजन कमी करण्यावर तिचा भर आहे. यासाठी योगा, जिम असे सगळे करिना सध्या करतेय. अगदी अलीकडे करिनाचे योगा क्लासनंतरचे काही फोटो व्हायरल झाले होते. लवकरच करिना ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमात परतणार आहे. त्याचमुळे प्रेग्नंसीनंतर आपले फिगर परत मिळवण्यासाठी करिना धडपडते आहे. अर्थातसोबतच तैमूरच्या संगोपनातही ती बिझी आहे. त्याची कुठलीही गैरसोय होणार नाही, त्याला पूर्ण वेळ मिळावा, याबद्दलही ती आग्रही आहे.

Web Title: Karan Kapoor's bold avatar in Karan Johar's party!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.