​ करण जोहर झाला जुळ्या मुलांचा ‘कुंवारा’ बाप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 11:29 IST2017-03-05T05:59:05+5:302017-03-05T11:29:05+5:30

बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर बाप झालाय. होय, ऐकता ते खरे आहे. एक नाही तर करण दोन ...

Karan Johar's twin boys 'Kunwarara' father ... | ​ करण जोहर झाला जुळ्या मुलांचा ‘कुंवारा’ बाप...

​ करण जोहर झाला जुळ्या मुलांचा ‘कुंवारा’ बाप...

लिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर बाप झालाय. होय, ऐकता ते खरे आहे. एक नाही तर करण दोन जुळ्या मुलांचा बाप झाला आहे. करणला सरोगसीच्या माध्यमातून पुत्र आणि कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे आणि याचबरोबर करण हा सरोगसीद्वारे सिंगल पेरेंट होणारा नजीकच्या काळातला  दुसरा सेलिब्रेटी ठरला आहे. जून २०१६ मध्ये अविवाहित असलेल्या तुषार कपूरला सरोगसीच्या माध्यमातून पुत्ररत्नाची प्राप्ती झाली होती.  अभिनेता शाहरुख खानचा तिसरा मुलगा असलेल्या अबराम याचा जन्मदेखील सरोगसीद्वारेच झालाय.   जून २०१३ मध्ये शाहरुखला तिसºया अपत्याची प्राप्ती झाली होती.  

करणने आपल्या मुलीचे  रुही तर मुलाचं  यश  असे ठेवले आहे. करणचे वडील आणि दिवंगत निर्माते यश जोहर यांच्या नावावरुन यश, तर आई हिरु जोहर यांच्या नावातील अक्षरांवरुन रुही हे नाव ठेवण्यात आले आहे. ७ फेब्रुवारीला या दोन बाळांचा जन्म मुंबईच्या अंधेरी भागातील मसरानी रुग्णालयात झाल्याची माहिती आहे. मात्र महिन्याभरापासून जोहर कुटुंबाने ही गोष्ट उघड केली नाही.शुक्रवारी करण जोहरच्या जुळ्या मुलांच्या जन्माची नोंदणी करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य अधिकारी पद्मजा केरकर यांनी दिली होती. त्यानंतर करणनेही   एका निवेदनाद्वारे त्याला सरोगसीने दोन मुलांची अपत्यप्राप्ती झाल्याची बाब जाहिर केली.

हा माझ्यासाठी आनंदाचा व भावूक क्षण आहे. पालक बनल्यानंतर येणाºया सर्व जबाबदा-या स्वीकारण्यास मी पूर्णपणे सज्ज आहे. माझ्या मुलांनी बिनशर्त प्रेम मिळावे, हेच माझे ध्येय असेल. यापुढे माझी दोन्ही मुले हेच माझे जग आहेत आणि माझे प्राधान्य आहे. यानंतर माझे काम, माझा प्रवास आणि माझ्या सामाजिक जबाबदाºया दुय्यम स्थानी असतील. देवाच्या कृपेने माझ्याकडे एक अतिशय प्रेमळ आणि खंबीर पाठींबा देणारी आई आहे. आपल्या नातवांना सांभाळण्यात आणि वाढवण्यात तिचीही महत्त्वाची भूमिका असेल. माझ्या निर्णयात मला पाठींबा आणि प्रेम देणाºया सगळ्यांचे आभार. विशेषत: डॉ. जतीन शहा यांचे आभार. त्यांच्या मार्गदर्शन वा पाठींब्याशिवाश हा जगावेगळा आनंद मला अनुभवता आला नसता, असे करणने म्हटले आहे.

नुकत्याच प्रकाशिता झालेल्या आपल्या अ‍ॅन अनसुटेबल बॉय आत्मचरित्रात करण जोहरने एक मुलाला दत्तक घेण्याची वा सरोगसीद्वारे बाप बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. वडील म्हणून करणच्या नावाची नोंदणी करण्यात आली असून आईच्या नावाचा उल्लेख नाही.  

Web Title: Karan Johar's twin boys 'Kunwarara' father ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.