करण जोहरन करणार चित्रपटात कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2017 17:43 IST2017-08-09T11:06:58+5:302017-08-09T17:43:31+5:30

करण जोहरने आतापर्यंत दिग्दर्शन केले आहे, चित्रपटांची निर्मितीदेखील केली आहे. तसेच त्यांने चित्रपटात अभिनयदेखील केला आहे. तुम्हाला बॉम्बे व्हेलवेट ...

Karan Joharan in the film Comeback | करण जोहरन करणार चित्रपटात कमबॅक

करण जोहरन करणार चित्रपटात कमबॅक

ण जोहरने आतापर्यंत दिग्दर्शन केले आहे, चित्रपटांची निर्मितीदेखील केली आहे. तसेच त्यांने चित्रपटात अभिनयदेखील केला आहे. तुम्हाला बॉम्बे व्हेलवेट आठवत असेल तर त्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. याच चित्रपटातून करणने अॅक्टिंगमध्ये डेब्यूसुद्धा केले होते. याआधी त्यांने शाहरुख खानच्या दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे मध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती. पण करणाला अभिनेता म्हणून प्रेक्षकांनी स्वीकारले नाही. त्यानंतर करणने जोहरने यापुढे अभिनय करायचा नाही असे ठरवले होते. मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार करण जोहर पुन्हा एकदा चित्रपटात अभिनय करणार आहे. रिपोर्टनुसार करण सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर दिलजीत दोसांझ स्टारर क्रेजी हममध्ये दिसणार आहे.

ALSO REDA : ​करण जोहर व काजोलमधील ‘अबोला’ संपणार का?

या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका असणार आहे. चित्रपटाचा लेखक करणसाठी दमदार डॉयलॉग लिहितो आहे. ज्यामुळे यावेळी प्रेक्षक करणचा अभिनय स्वीकार करु शकतील. एक वृत्तपत्राच्या माहितीनुसार चित्रपटात करण जोहरच्या भूमिकेबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी सरप्राईज असणार आहे करणने नुकताच त्यांच्या दोन गोंडस मुले असलेली रुही आणि यशचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. माझ्या आयुष्यात रुही आणि यश या जुळ्या गोंडस मुलांनी प्रवेश केला आहे. वयाच्या 44 व्या वर्षी मेडिकल सायन्सच्या मदतीने मी बाप बनू शकलो. असा मेसेज त्यांने फोटोसोबत लिहिला होता.    


 

Web Title: Karan Joharan in the film Comeback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.