आता अनुष्का-विराटच्या मुलालाही लॉन्च करणार का? करण जोहर पुन्हा झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 13:23 IST2020-08-30T13:22:56+5:302020-08-30T13:23:28+5:30

अनुष्काच्या प्रेग्नंसी पोस्टवर कमेंट करून फसला करण जोहर

karan johar trolled as he wishes anushka sharma and virat kohli on their pregnancy post |  आता अनुष्का-विराटच्या मुलालाही लॉन्च करणार का? करण जोहर पुन्हा झाला ट्रोल

 आता अनुष्का-विराटच्या मुलालाही लॉन्च करणार का? करण जोहर पुन्हा झाला ट्रोल

ठळक मुद्देसतत होणा-या ट्रोलिंगमुळे करण जोहर सोशल मीडियावरुन गायब झाला होता.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर नेटक-यांच्या निशाण्यावर आलेला करण जोहर पुन्हा एकदा जबरदस्त ट्रोल झाला. कारण काय तर त्याची एक कमेंट. होय, अभिनेत्री अनुष्का शर्माच्या प्रेग्नंसीवर करण जोहरने प्रतिक्रिया दिली आणि तो ट्रोल झाला.
अनुष्का शर्मा लवकरच आई होणार आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली होती. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असे कॅप्शन देत अनुष्काने विराटसोबतचा फोटो शेअर केला. अनेकांनी अनुष्काच्या या पोस्टवर  कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या. करण जोहरनेही कमेंट केली. पण त्याची कमेंट पाहताच युजर्सनी त्याला ट्रोल करणे सुरु केले.  
‘प्रेम प्रेम आणि खूप  प्रेम,’असे करण जोहरने अनुष्काच्या पोस्टवर कमेंट करताना लिहिले.  त्याच्या या कमेंटवर अनेकांनी उत्तर देत त्याला ट्रोल केले. 

आता अनुष्का-विराटच्या मुलालाही लॉन्च करणार का?
आता अनुष्का व विराटच्या मुलालाही लॉन्च करणार का? अशा शब्दांत एका युजरने करण जोहरला ट्रोल केले. अन्य एका युजरने करणला ‘नेपोटिजम का बाप आया,’ असे लिहिले तर दुस-या एकाने ‘स्टुडंट आॅफ द इअर 420’ लिहित करणला फैलावर घेतले. ‘फक्त 20 वर्षे वाट पाहा, मग तिला किंवा त्याला तू लॉन्च करू शकतोस,’ असे एका युजरने लिहिले.

पुन्हा अ‍ॅक्टिव्ह...

  सुशांत सिंग राजपूतच्या स्मरणार्थ करण जोहरने एक पोस्ट शेअर केली होती. मात्र त्याची ही पोस्ट सुशांतच्या फॅन्सना आवडली नव्हती आणि त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली होती. त्यातच कंगना राणौत करण जोहरवर बरसली होती. यानंतर करणवर चारही बाजूने टीकेची झोड उठली होती.  सतत होणा-या ट्रोलिंगमुळे करण जोहर सोशल मीडियावरुन गायब झाला होता. आधी त्याने ट्विटरवर वरुन अनेकांना अनफॉलो केले. त्यानंतर पोस्ट करणे देखील थांबवले होते. मात्र  अलीकडे स्वातंत्र्य दिनानिमित्त पोस्ट करत करण जोहर पुन्हा सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह झाला आहे. 

 
 

Web Title: karan johar trolled as he wishes anushka sharma and virat kohli on their pregnancy post