करण जोहरप्रमाणे या सेलिब्रिटींनीही ‘बाप’ बनण्यासाठी घेतली सरोगसीची मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2017 17:32 IST2017-03-05T11:38:26+5:302017-03-05T17:32:58+5:30

‘माझ्या आयुष्यात यश आणि रूही दोघांनी प्रवेश केला आहे. मी स्वत:ला अतिशय नशीबवान मानतो की, मेडिकल सायन्सच्या मदतीने मी ...

Like Karan Johar, these celebrities also helped to become 'father'! | करण जोहरप्रमाणे या सेलिब्रिटींनीही ‘बाप’ बनण्यासाठी घेतली सरोगसीची मदत!

करण जोहरप्रमाणे या सेलिब्रिटींनीही ‘बाप’ बनण्यासाठी घेतली सरोगसीची मदत!

ong>‘माझ्या आयुष्यात यश आणि रूही दोघांनी प्रवेश केला आहे. मी स्वत:ला अतिशय नशीबवान मानतो की, मेडिकल सायन्सच्या मदतीने मी पिता बनू शकतो. मी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेतला. ही मुलेच आता माझे जग असणार आहेत. यानंतर माझी ही दोन मुलेच माझी पहिली आणि शेवटची जबाबदारी असणार आहेत..’, हे शब्द आहेत, बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याचे. होय, सरोगसीच्या माध्यमातून करण हा रूही आणि यश या दोन जुळ्या मुलांचा बाप बनला आहे. यामुळे सध्या तो अतिशय आनंदात आहे. पण हा आनंद अनुभवणारा करण हा एकटा बॉलिवूड सेलिब्रिटी नाही. याआधीदेखील सरोगसी व आयव्हीएफ तंत्राद्वारेच्या माध्यमातून काही सेलिब्रिटींनी अपत्य मिळवले आहेत. 


सोहेल खान - सीमा खान



सलमान खानचा भाऊ सोहेल खान याने सुद्धा सरोगसीचा वापर केला आहे. सोहेलचा दुसरा मुलगा योहान याचा जन्म याच माध्यमातून झालाय. सोहेल आणि त्याची पत्नी सीमा या दोघांना आधीच एक मुलगा होता. पण त्यांना दुसरे अपत्य हवे होते. यासाठी त्यांनी सरोगसीचा आधार घेतला.
 
शाहरूख खान - गौरी खान



 बॉलिवूडचा ‘किंगखान’ याचा लाडका मुलगा अबराम हा सुद्धा सरोगसीची देणं आहे. आर्यन आणि सुहाना या दोन मुलांपश्चात शाहरूख व गौरीला तिसरे मुल हवे होते. यासाठी त्यांनी सरोगसीचा पर्याय निवडला.  २७ मे २०१३ रोजी अबरामचा जन्म झाला. आज अबराम म्हणजे शाहरूखचा जीव की प्राण आहे. तो अनेकदा अबरामसोबत दिसतो.

 आमिर खान- किरण राव 



बॉलिवूड स्टार आमिर खान आणि किरण राव यांचा मुलगा आझाद याचा जन्मही सरोगसीद्वारे झाला आहे.  ५ डिसेंबर २०११ मध्ये आझादचा जन्म झाला. आझादच्या जन्मावेळी आमिर म्हणाला होता की, हे बाळ आमच्यासाठी खूप खास आहे. कारण त्याच्या जन्मासाठी त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला आणि खूप वाट बघावी लागली.


फराह खान -शिरीष कुंदर 



 बॉलिवूडची सुप्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खान हिने वयाच्या ४० व्या वर्षी शिरीष कुंदरसोबत लग्न केले. दोन वर्षे  अपत्यप्राप्तीची प्रतीक्षा केल्यानंतर अखेर फराह व शिरीष यांनी  आयव्हीएफ तंत्राची मदत घेण्याचा निर्णय घेतला. अखेर ११ फेबु्रवारी २००८ रोजी फराहने तिळ्यांना जन्म दिला.
 

तुषार कपूर 


 
करण जोहरप्रमाणे अभिनेता तुषार कपूर हा सुद्धा ‘कुवारा’ बाप बनला आहे. तुषारने लग्न न करता सिंगल पॅरेंट बनण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने सरोगसीची मदत घेतली. २०१६ मध्ये तो मुलाचा बाप बनला. या मुलाचे लक्ष्य असे नामकरण केले गेले.
 

Web Title: Like Karan Johar, these celebrities also helped to become 'father'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.