करण जोहरने सांगितले त्याचं वेटलॉस सीक्रेट, ओझेम्पिक घेतलं? कसा झाला झटपट बारीक?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 16:56 IST2025-05-07T16:56:18+5:302025-05-07T16:56:34+5:30

करण जोहरचं वजन घटवण्यामागे खरंच ओझेम्पिक? सत्य आलं समोर

Karan Johar Revealed His Weight Loss Secret Omad Diet Not Ozempic | करण जोहरने सांगितले त्याचं वेटलॉस सीक्रेट, ओझेम्पिक घेतलं? कसा झाला झटपट बारीक?

करण जोहरने सांगितले त्याचं वेटलॉस सीक्रेट, ओझेम्पिक घेतलं? कसा झाला झटपट बारीक?

करण जोहर (Karan Johar) हा एक प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक आहे. त्याचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. ५२ वर्षांचा असलेल्या करण याने अचानक लक्षणीय वजन कमी केलंय. त्याच्यामध्ये झालेला हा बदल पाहून चाहते थक्क झालेत.  अनेकांनी असा दावा केला की त्यांनी वजन कमी करण्यासाठी ओझेम्पिक या औषधाचा वापर केला आहे. मात्र आता करणने स्वतः त्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

करण जोहरने नुकतंच राज शमानीच्या पॉडकास्टमध्ये विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी करणने त्याच्या कमी झालेल्या वजनामागचं कारणसुद्धा सांगितलं. आपल्या वजन घटवण्याच्या प्रवासाविषयी मोकळेपणाने बोलताना करणने सांगितलं, "मी ओझेम्पिक घेतलं नाही आहे. लोक म्हणतात की मी ते घेतो, आता या आरोपांना मी कंटळलो. लोकांना खरी गोष्ट माहिती नाही".

करण म्हणाला, "मी एकटाच दोन मुलांचा पालक आहे. माझं जीवन मी कधीही लपवलं नाही. 'UnSuitable Boy' या पुस्तकातही मी माझ्या आयुष्यातील अनेक खऱ्या गोष्टी शेअर केल्या आहेत. जर मी ओझेम्पिक घेतलं असतं, तर तेही मी खुलेपणाने मान्य केलं असतं".

 यावेळी करण जोहरने त्याला थायरॉईडची समस्या असल्यानं सांगितलं. तो म्हणाला, "मी हजारो डाएट्स केल्या, शेकडो वर्कआउट्स केले. पण वजन कमी झालं नाही. थायरॉईडमुळं वजन कमी करणे नेहमीच कठीण जात होतं.  आता मी 'OMAD' (One Meal A Day) हा डाएट प्लान फॉलो करतोय. गेल्या सात महिन्यापासून दररोज रात्री ८:३० वाजता एकदाच जेवण घेत होतो. त्यात लॅक्टोज, ग्लूटेन आणि साखरेचा समावेश नसतो" असं त्यांनी स्पष्ट केलं. यासोबतचं पहिले सात दिवस कठीण होते, पण सात महिने हाच दिनक्रम सुरू ठेवल्याचं करणने सांगितलं.
 

Web Title: Karan Johar Revealed His Weight Loss Secret Omad Diet Not Ozempic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.