"मी मुलींसारखा चालायचो आणि बोलायचो", करण जोहरचा मोठा खुलासा, म्हणाला- "पुरुषांसारखं बोलण्यासाठी मी ३ वर्ष ..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 14:21 IST2025-11-20T14:21:12+5:302025-11-20T14:21:53+5:30
करणला त्याच्या ड्रेसिंग स्टाइल आणि चालण्या बोलण्याच्या सवयीवरुन अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. आता दिलेल्या मुलाखतीत त्याने पुरुषांसारखं बोलायला शिकावं म्हणून व्हॉइस कोचिंग केल्याचा खुलासा केला. याशिवाय लहानपणी मुलींसारखा बोलायचो आणि चालायचो असा खुलासाही करणने केला आहे.

"मी मुलींसारखा चालायचो आणि बोलायचो", करण जोहरचा मोठा खुलासा, म्हणाला- "पुरुषांसारखं बोलण्यासाठी मी ३ वर्ष ..."
बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता म्हणजे करण जोहर. अनेक नेपोकिड्सला करणने त्याच्या सिनेमातून पदार्पणाची संधी दिली. करणला त्याच्या ड्रेसिंग स्टाइल आणि चालण्या बोलण्याच्या सवयीवरुन अनेकदा ट्रोल केलं गेलं आहे. आता दिलेल्या मुलाखतीत त्याने पुरुषांसारखं बोलायला शिकावं म्हणून व्हॉइस कोचिंग केल्याचा खुलासा केला. याशिवाय लहानपणी मुलींसारखा बोलायचो आणि चालायचो असा खुलासाही करणने केला आहे.
करणने सानिया मिर्झाच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये तो म्हणाला, "मला लहानपणापासूनच वेगवेगळे कोर्स करण्याची हौस होती. नवीन गोष्टी शिकण्यात मला प्रचंड रस होता. जिथे दुसरी मुलं स्पोर्टस खेळायचे तिथे मी जेवण बनवणे, सजावट करणं या गोष्टी शिकत होतो. मी इम्पोर्ट एक्सपोर्टचा कोर्सही केला होता. ज्यामध्ये पब्लिक स्पिकिंग ही एक गोष्ट होती. मला शाळेत वत्कृत्व स्पर्धेत आणि नाटकांमध्ये भाग घ्यायला आवडायचं. जे ती अकॅडमी चालवायचे त्यांनी दोन सेशननंतर मला बोलवलं आणि सांगितलं की तू खूप हुशार मुलगा आहेस. पण, तुझा आवाज मात्र मुलींसारखा आहे. तुझी पर्सनालिटी ही मुलींसारखी आहे. तुझा आवाज पण मुलींसारखा आहे. हे जग अशा मुलांना स्वीकारत नाही. मी तुला तुझा आवाज सुधारण्यात आणि तो मुलांसारखा करण्यात मदत करू शकतो".
पुढे तो म्हणाला, "ही १९८९ची गोष्ट आहे. तेव्हाच्या काळात अशा गोष्टींबद्दल फार कमी माहिती होती. याबाबत कोणी बोलायचंही नाही. मी कमजोर आणि घाबरलेला होतो. त्यामुळे मी त्यांचा सल्ला ऐकला आणि ३ वर्ष तो वॉइस कोचिंगचा क्लास केला. यासाठी मी पैसे मोजले. एका आठवड्यात तीन वेळा २ तासांसाठी मी जायचो. मात्र माझ्या वडिलांना याबाबत सांगायला मला लाज वाटायची. त्यांना का? असं विचारलं तर त्याचं उत्तरही माझ्याकडे नव्हतं. मी वडिलांना कॉम्युटर क्लासला जातोय, असं खोटं सांगितलं होतं. त्यांच्याकडून मी फीसाठी पैसे घ्यायचो आणि ते वॉइस कोचिंगला द्यायचो".
"मी हा कोर्स यासाठी केला कारण मी मुलींसारखा चालायचो आणि बोलायचोय त्या अकॅडमीच्या टीचरने मला हे सांगितलं होतं की जर तू पुरुषांसारखा बोलला नाहीस तर तू या जगाचा सामना आत्मविश्वासाने करू शकणार नाहीस. तेव्हा मी १५ वर्षांचा होतो आणि हे मी १८-१९ वर्षांचा होईपर्यंत सुरू होतं", असंही करणने सांगितलं.