करण जोहरने काजोलला ‘त्या’ वेदनादायी क्षणाची करून दिली आठवण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 21:30 IST2017-11-09T15:58:39+5:302017-11-09T21:30:12+5:30
निर्माता करण जोहर आणि अभिनेत्री काजोल यांच्यात पुन्हा एकदा पूर्वीसारखे संबंध निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. ट्विटर चॅटवर जे ...

करण जोहरने काजोलला ‘त्या’ वेदनादायी क्षणाची करून दिली आठवण!
न र्माता करण जोहर आणि अभिनेत्री काजोल यांच्यात पुन्हा एकदा पूर्वीसारखे संबंध निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. ट्विटर चॅटवर जे काही समोर येत आहे त्यावरूनच आम्ही हे म्हणत आहोत. होय, ट्विटर चॅटमध्ये दोघे एकमेकांशी बरेचशा गुजगोष्टी करताना बघावयास मिळाले. त्याचे झाले असे की, काजोलने ट्विटरवर तिचा एक फोटो शेअर केला. विशेष म्हणजे तिने हा फोटो करणला टॅग केला. हा फोटो शेअर करताना तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पहा मला काय मिळाले, माझ्या पहिल्या प्रेमासोबत माझा फोटो... माझी सर्वात पहिली कार’
यावेळी काजोलने या कारसोबत तिचा एकेकाळचा खास मित्र करणसोबतच्या आठवणीही ताज्या केल्या. यावेळी करणने काजोलला रिट्विट करताना लिहिले की, ‘या कारमध्ये मनीषसोबतची अतिशय वेदनादायी ड्राइव्ह आजही माझ्या स्मरणात आहे.’ या फोटोमध्ये काजोल एखाद्या मॉडेलसारखी दिसत आहे. काजोल कारच्या वरती एखाद्या मॉडेलसारखी पोझ देताना दिसत आहे. यावेळी काजोलने व्हाइट टॉप आणि डेनिम जीन्स परिधान केलेली आहे.
गेल्यावर्षी बॉक्स आॅफिसवर ‘शिवाय’ आणि ‘ऐ दिल है मुश्किल’ क्लॅश झाल्याने दोघांच्या मैत्रीत काहीशी दरार निर्माण झाली होती. या कारणामुळे दोघांनी काही महिने एकमेकांशी बोलणेही पसंत केले नाही. मात्र करणच्या मुलांनी या दोघांमध्ये पुन्हा एकदा मैत्री निर्माण केली. आता हे दोघे पुन्हा एकदा चांगले मित्र होत असताना दिसत आहे. काजोल तर आजही करणला तिचा लकी चार्म मानते. असो, या दोघांमध्ये पुन्हा एकदा मैत्री निर्माण व्हावी, अशीच त्यांच्या चाहत्यांची इच्छा असेल.