करण जोहरला नकार देणे प्रभासला पडले महाग! ‘साहो’ अडचणीत!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 14:04 IST2018-02-23T08:34:05+5:302018-02-23T14:04:05+5:30
‘बाहुबली’ स्टार प्रभासच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, ‘बाहुबली2’नंतर प्रभासचा ‘साहो’ पाहण्यास चाहते उत्सूक आहेत. पण ‘साहो’ अडचणीत ...
.jpg)
करण जोहरला नकार देणे प्रभासला पडले महाग! ‘साहो’ अडचणीत!!
‘ ाहुबली’ स्टार प्रभासच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, ‘बाहुबली2’नंतर प्रभासचा ‘साहो’ पाहण्यास चाहते उत्सूक आहेत. पण ‘साहो’ अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत आणि यामागे करण जोहर असल्याची चर्चा आहे. आता करण आणि प्रभासचा ‘साहो’ यांच्यात काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर संबंध आहे. तुम्हाला आठवत असेलचं की, ‘बाहुबली2’नंतर करण जोहरने प्रभासला बॉलिवूड चित्रपटाची आॅफर दिली होती. पण प्रभासने मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ही आॅफर धुडकावून लावली होती. तेव्हापासून करण व प्रभास यांच्यात ‘कोल्ड वॉर’ सुरू असल्याचे कळतेय. याच ‘कोल्डवॉर’मुळे ‘साहो’च्या हिंदी व्हर्जनला कुठलाही निर्माता मिळेनासा झाला आहे. ‘साहो’ हा हिंदी, तामिळ, तेलगू व मल्याळम अशा चार भाषांत तयार होत आहे. पण ताज्या बातमीनुसार, हिंदीतला कुठलाच प्रोड्यूसर या बिग बजेट सायन्स फिक्शनमध्ये रस दाखवेनासा झाला आहे. हिंदी मार्केट ‘कॅश’ करण्याच्या नादात मेकर्सने ‘साहो’चा बजेट वाढवला होता. इतका की, केवळ एकाच अॅक्शन सीनसाठी ३० कोटी रूपये खर्च केले गेलेत. पण इतके करूनही हिंदी व्हर्जनमध्ये निर्मात्यांना म्हणे रस नाहीये.
ALSO READ : विरह झाला असह्य! चेह-याला रूमाल बांधून अनुष्का शेट्टीला भेटायला पोहोचला प्रभास!!
‘बाहुबली2’ सुपरडुपर हिट झालेला पाहून करण जोहर दिग्दर्शक एस. एस. राजमौलीला सोबत घेऊन प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार अशी बातमी आली होती. करण जोहर प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यास अगदी तयार होता. त्याने याबद्दल प्रभाससोबत चर्चाही केली होती. पण प्रभासने म्हणे, या प्रोजेक्टसाठी २० कोटी रूपयांची मागणी केली. ही रक्कम ऐकून करण जोहरची बोलतीच बंद झाली. यानंतर करणने म्हणे प्रभासला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याचा इरादाच सोडून दिला. यादरम्यान प्रभास ‘साहो’ या चित्रपटात बिझी झाला. या चित्रपटात श्रद्धा कपूर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, नील नितीन मुकेश यासारख्या बॉलिवूड स्टार्सची वर्णी लागली आहे.