​ करण जोहरमुळे जान्हवी कपूर होणार ‘गायब’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 10:25 IST2017-03-14T04:55:19+5:302017-03-14T10:25:19+5:30

श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर हिने आपल्या सौंदर्याने लाखो नेटिजन्सला अक्षरश: वेड लावले आहे. इंटरनेटवर तिच्या छायाचित्रांचा जणू पूर ...

Karan Johar to make Jahvani Kapoor 'disappear'? | ​ करण जोहरमुळे जान्हवी कपूर होणार ‘गायब’?

​ करण जोहरमुळे जान्हवी कपूर होणार ‘गायब’?

रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर हिने आपल्या सौंदर्याने लाखो नेटिजन्सला अक्षरश: वेड लावले आहे. इंटरनेटवर तिच्या छायाचित्रांचा जणू पूर आलाय. अलीकडे जान्हवी वीस वर्षांची झाली. आता जान्हवीला वेध लागलेत, ते बॉलिवूडचे. तिचे लाखो चाहतेही तिच्या बॉलिवूड डेब्यूसाठी उत्सूक आहेत. बॉलिवूडचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर जान्हवीला लॉन्च करणार आहे, हे आधीच ठरले आहे. पण आता आमच्या कानावर जान्हवीच्या लॉन्चिंगच्या निमित्ताने एक नवी बातमी आली आहे. होय, जान्हवीचे लॉन्चिंग ग्रॅण्ड होणार, यात तर काही शंका नाहीय. पण करण जोहर जान्हवीला आगळ्या-वेगळ्या पद्धतीने लॉन्च करू इच्छितो. होय, लॉन्चपर्यंत जान्हवीला सगळ्यांच्या नजरेपासून लपवून ठेवण्याचा करणचा प्लान आहे. मीडिया, अवार्ड शो अशा सगळ्या प्रकाशझोतापासून जान्हवीला दूर ठेवण्यासाठी सध्या करणचा आटापिटा सुरु आहे. करणने जान्हवीला तशा सूचनाही दिल्या आहेत. त्यामुळे येत्या काही दिवस जान्हवी कुठेही दिसली नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको.

‘सैराट’च्या गाजलेल्या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेकमधूल करण जान्हवीला लॉन्च करणार असल्याची खबर आहे. पण अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सध्या तरी मीडियापासून जान्हवीला लपवून ठेवणे, इतकेच करण करताना दिसतोय.

आत्तापर्यंत केवळ आदित्य चोप्रा आपल्या चित्रपटातील नव्या चेहºयाला मीडियापासून लपवतांना दिसायचा. मग ती अनुष्का शर्मा असो, परिणीती चोप्रा वा अर्जुन कपूर. या सगळ्यांना आदित्य चोप्राने त्यांच्या लॉन्चिंगच्या वेळेस मीडियाच्या नजरेपासून लपवून ठेवले होते. कदाचित आता करण जोहरही आदित्यच्या वाटेवर चालू पाहतोय. अर्थात यात करण किती यशस्वी ठरतो,ते बघूच!!

  

Web Title: Karan Johar to make Jahvani Kapoor 'disappear'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.