करण जोहरने 'कुछ कुछ होता है २' बनवण्यासाठी दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 08:00 IST2018-11-11T08:00:00+5:302018-11-11T08:00:00+5:30

अभिनेता शाहरूख खान व अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांचा सुपरहिट चित्रपट 'कुछ कुछ होता है'चा सीक्वल बनवण्यास निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने नकार दिला आहे.

Karan Johar has refused to give up 'something happens 2' | करण जोहरने 'कुछ कुछ होता है २' बनवण्यासाठी दिला नकार

करण जोहरने 'कुछ कुछ होता है २' बनवण्यासाठी दिला नकार

ठळक मुद्दे'कुछ कुछ होता है'चा सीक्वल बनणार नाही

 अभिनेता शाहरूख खान व अभिनेत्री काजोल आणि राणी मुखर्जी यांचा १९९८ साली 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रेक्षकांना खूपच भावला. यातील सर्व पात्रांनी रसिकांना चांगलीच भुरळ पाडली. आजही हा सिनेमा प्रेक्षकांना पाहायला खूप आवडतो. या चित्रपटाचा सीक्वल बनणार असल्याचे बोलले जात होते. मात्र निर्माता- दिग्दर्शक करण जोहरने 'कुछ कुछ होता है'चा सीक्वल बनणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

खरेतर एका वेबसाईटच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करत लिहिले होते की, 'करण 'कुछ कुछ होता है'चा सीक्वल बनवणार आहे.' याच्या उत्तरात करनने नाही सांगितले. नुकतेच या चित्रपटाला वीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सेलिब्रेशन करण्यात आले होते. 'कुछ कुछ होता है' चित्रपटाचा सीक्वल येणार नाही हे समजल्यावर चाहते नाराज झाले आहेत. 
सध्या करण जोहर अालिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जान्हवी कपूर, अनिल कपूर, रणवीर सिंग व करीना कपूर अभिनीत 'तख्त' चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. हा पीरिएड ड्रामावर आधारीत चित्रपट असून यात युद्ध पाहायला मिळणार आहे. तख्त चित्रपटात मुघल साम्राज्यातील बादशाह शाहजहांच्या अखेरच्या दिवसातील कथा पाहायला मिळणार आहे. बादशाह आजारी पडतो आणि त्यांच्या मुलांमध्ये 'तख्त' मिळवण्यासाठी भांडणे सुरू होतात, यावर आधारीत हा चित्रपट भाष्य करतो.
 

 

Web Title: Karan Johar has refused to give up 'something happens 2'