​या अभिनेत्रीमुळे करण जोहरने आजवर केले नाही लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 13:38 IST2017-10-24T08:08:07+5:302017-10-24T13:38:07+5:30

सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न जसा त्याच्या चाहत्यांना पडला आहे. तसेच करण जोहर लग्न कधी करणार याची ...

Karan Johar has not married this actress | ​या अभिनेत्रीमुळे करण जोहरने आजवर केले नाही लग्न

​या अभिनेत्रीमुळे करण जोहरने आजवर केले नाही लग्न

मान खान लग्न कधी करणार हा प्रश्न जसा त्याच्या चाहत्यांना पडला आहे. तसेच करण जोहर लग्न कधी करणार याची देखील उत्सुकता सगळ्यांना लागलेली आहे. करण लग्न कधी करणार असे त्याला अनेकवेळा विचारले जाते आणि तो हसत या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतो. तुम्हाला माहीत आहे का करण लहान असल्यापासूनच त्याचे एका मुलीवर प्रचंड प्रेम होते. ही मुलगी आज एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीचे आता लग्न झाले असून ती तिच्या आयुष्यात सेटल देखील आहे.
करणच्या आय़ुष्यात आलेली ही मुलगी ट्विंकल खन्ना होती. करण आणि ट्विंकल एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. ते दोघे एकाच बोर्डिंग स्कूलमध्ये होते. तेव्हापासूनच करणला ट्विंकल आवडते. आजवर त्याने ज्या स्त्रीवर प्रचंड प्रेम केले आहे, ती स्त्री ट्विंकल असल्याचे त्याने अनेकवेळा कबूल केले आहे. 
मिसेस फनीबोन या ट्विंकलच्या पुस्तकाच्या लाँचिंग प्रसंगी करण उपस्थित होता. त्यावेळी ट्विंकलने त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितला होता. ती म्हणाली होती की, बोर्डिंग स्कूलमध्ये असल्यापासून मी करणला आवडते असे त्याने मला अनेकवेळा सांगितले आहे. आमची लहानपणापासून खूप घट्ट मैत्री आहे. आम्ही बोर्डिंग स्कूलमध्ये असताना करणला प्रचंड भूक लागायची आणि तो मला तिथून जेवण चोरायला सांगायचा. शेवटी चिडून मी त्याला बोर्डिंग स्कूलमधून पळून जायला सांगितले होते. आमचे बोर्डिंग एका डोंगरावर होते. डोंगरावरून पळत जा आणि खाली उतरल्यावर बोट पकडून घर गाठ असा सल्ला मी त्याला दिला होता. पण बोर्डिंगच्या लोकांनी त्याला पकडले आणि त्यांनी त्याला तो डोंगर पुन्हा चढायला सांगितला होता. बिचाऱ्याला डोंगर चढायला जवळजवळ दोन तास लागले होते. दुसऱ्या दिवशी त्याला मुख्याध्यापकांच्या समोरदेखील उभे करण्यात आले होते.
करण ट्विंकलच्या प्रेमात इतका वेडा होता की, कुछ कुछ होता है या त्याच्या पहिल्या चित्रपटात ट्विंकलने काम करावे अशी त्याची इच्छा होती. पण तिने नकार दिल्याने राणी मुखर्जीची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली. करण ट्विंकलला टीना या नावाने हाक मारत असल्याने राणीच्या व्यक्तिरेखेचे नावही त्याने या चित्रपटात टीनाच ठेवले होते. 

Also Read : शाहरुख खानचा ऑनस्क्रिन मुलगा करणार करण जोहरसोबत ब्रह्मास्त्रमध्ये काम

Web Title: Karan Johar has not married this actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.