शनाया कपूरला लाँच करण्याची घोषणा करताच करण जोहर झाला ट्रोल, पाहा मजेदार मीम्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 15:36 IST2021-03-23T15:34:16+5:302021-03-23T15:36:39+5:30

करणने शनायला लाँच करणार याची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

karan johar got trolled after announcing shanaya kapoor bollywood launch | शनाया कपूरला लाँच करण्याची घोषणा करताच करण जोहर झाला ट्रोल, पाहा मजेदार मीम्स

शनाया कपूरला लाँच करण्याची घोषणा करताच करण जोहर झाला ट्रोल, पाहा मजेदार मीम्स

ठळक मुद्देकरण जोहरने आजवर अनेक स्टार किडना लाँच केले आहे. त्यामुळे नेहमीच त्याच्यावर नेपोटिझमचा आरोप लावला जातो.

स्टारकिड्सला लॉन्च करणारा दिग्दर्शक-निर्माता करण जोहरने सोमवारी अभिनेता संजय कपूरची लेक शनाया कपूर हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्याची घोषणा केली. यानंतर काय तर, सोशल मीडिया युजर्सनी करणला जबरदस्त ट्रोल केले. बॉलिवूडच्या घराणेशाहीवरून युजर्सनी करणवर निशाणा साधला.

करण जोहरने आजवर अनेक स्टार किडना लाँच केले आहे. त्यामुळे नेहमीच त्याच्यावर नेपोटिझमचा आरोप लावला जातो. आता त्याने शनायला लाँच करणार याची घोषणा केल्यापासून सोशल मीडियावर त्याला मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले जात आहे.

शनायाने धर्मा प्रॉडक्शनच्या ‘गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ या सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. शरण शर्मा यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात जान्हवी कपूर, पंकज त्रिपाठी, अंगद बेदी महत्त्वपूर्ण भूमिकेत होते.

करणला ट्रोल करणारी अनेक मीम्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. 

 

Web Title: karan johar got trolled after announcing shanaya kapoor bollywood launch