भारतीय पहिल्या महिला एयरफोर्स पायलटवर करण जोहर तयार करणार चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 19:14 IST2017-11-08T08:44:17+5:302017-11-08T19:14:40+5:30

बॉलिवूडचा निर्माता करण जोहर एक नवी बायोपिक बनवण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट पहिली महिला पायलटवर आधारित आहे. गुंजन सक्सेनाच्या ...

Karan Johar to be the first Indian Air Force pilot on film | भारतीय पहिल्या महिला एयरफोर्स पायलटवर करण जोहर तयार करणार चित्रपट

भारतीय पहिल्या महिला एयरफोर्स पायलटवर करण जोहर तयार करणार चित्रपट

लिवूडचा निर्माता करण जोहर एक नवी बायोपिक बनवण्याच्या तयारीत आहे. हा चित्रपट पहिली महिला पायलटवर आधारित आहे. गुंजन सक्सेनाच्या आयुष्यावर हा चित्रपट तयार करण्यात येणार आहे. गुंजन यांनी 17 वर्षांपूर्वी झालेल्या कारगिल युद्धात आपले शौर्य जगाला दाखवले होते. त्यांनी युद्धा दरम्यान जखमी झालेल्या जवानांचे प्राण हेलिकॉप्टरव्दारे वाचवले होते आणि एक नवा इतिहास त्यांनी लिहिला होता.  याच कारणामुळे आजही त्यांना कारगिल गर्ल म्हणून ओळखले जाते. गुंजन श्रीविद्या राजन या पहिल्या पहिला फायटर पायलट आहेत. त्यांनी भारत पाकिस्तान युद्धात सहभाग घेतला होता. युद्ध करताना जखमी झालेल्या सैनिकांना त्या चीत हेलीकॉप्टरमधून घेऊन यायच्या. जवळपास आठवडाभर त्यांनी बटालिक सेक्टर आणि सैनिकांच्या तुकड्यांना सामान पोहोचवण्याचे काम केले होते.   

आउटलुकच्या रिपोर्टनुसार, गुंजन यांनी पाकिस्तान कडून गोळीबार आणि मिसाईलने हल्ले होत असताना देखील आपले काम न डगमगता सुरु ठेवले होते. त्यांच्या या कामासाठी त्यांना शौर्य चक्रने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचा भाऊ आणि वडील देखील सैन्यात होते. 1994 साली वयाच्या 25 व्या वर्षी त्या वायुसेनेत रुजु झाल्या होत्या. 
एक इंटरवह्रु दरम्यान त्या म्हणाल्या होत्या, ''तुम्ही एखाद्याचे प्राण वाचवता यापेक्षा जास्त काही समाधानकारक गोष्ट होऊ शकत नाही.''  17 वर्ष त्या वायुसेनेत कार्यरत होत्या. त्यांनी लग्न सुद्धा वायुसेनेतील पायलटशीच केले. 

करण सध्या त्याचा आगामी चित्रपट ब्रह्मास्त्रच्या कामात बिझी आहे. याचा  पहिला भाग १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आणि अमिताभ बच्चन दिसणार आहेत. आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. या चित्रपटासाठी रणबीरने घोडेस्वारी आणि जिम्नॅस्टिकची ट्रेनिंग घ्यायला सुरुवात सुद्धा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करतो आहे.  हा चित्रपट ३ भागात तयार करण्यात येणार आहे. 

Web Title: Karan Johar to be the first Indian Air Force pilot on film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.