वडिलांसमोरच या अभिनेत्याला द्यावा लागला होता किसिंग सीन, स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 18:01 IST2020-04-23T17:56:34+5:302020-04-23T18:01:53+5:30

  सनी देओलचा मुलगा करण देओलने 'पल पल दिल के पास'मधून  बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमाचे स्वत: सनी देओल ...

karan deol reveals he was very nervous doing kissing scene in front of dad sunny deol gda | वडिलांसमोरच या अभिनेत्याला द्यावा लागला होता किसिंग सीन, स्वत: केला खुलासा

वडिलांसमोरच या अभिनेत्याला द्यावा लागला होता किसिंग सीन, स्वत: केला खुलासा

 सनी देओलचा मुलगा करण देओलने 'पल पल दिल के पास'मधून  बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. या सिनेमाचे स्वत: सनी देओल केले होते. 


काही महिन्यांपूर्वी या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान दैनिक जागरणच्या रिपोर्टनुसार एका मुलाखती दरम्यान करण देओलने सिनेमातील किसिंग सीन्सशी संबंधीत किस्सा शेअर केला होता. करण म्हणाला वडिलांसमोर किसिंग सीन शूट करताना मला प्रचंड दडपण आले होते. मी परिस्थिती खूप आवडल्यासारखी झाली होती. मात्र त्यांनतर मी सगळं विसरलो कारण किसिंग सीन हा त्या कथेची गरज होती. हा एक रोमाँटिक सिनेमा होता.


बॉक्स ऑफिसवर या सिनेमाला म्हणावं तसं यश मिळाले नाही. पण हो, या चित्रपटातील करणच्या अभिनयाचे मात्र कौतुक झाल्याशिवाय राहिले नाही. 


 करण आता एका तेलगू सुपरहिट चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये झळकणार आहे. करणचा हा दुसरा सिनेमाही त्याचे पापा सनी देओल हेच प्रोड्यूस करणार आहेत. हा सिनेमा ‘ब्रोचेवरेवरूआ’ या तेलगू चित्रपटाचा रिमेके असेल. सनीने या सिनेमाचे हक्क विकत घेतले आहे. सध्या कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व सिनेमाचे शूटींग ठप्प आहे. त्यामुळे परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर सनी या चित्रपटाची घोषणा करणे अपेक्षित आहे.

Web Title: karan deol reveals he was very nervous doing kissing scene in front of dad sunny deol gda