जाणून घ्या अनिल कपूर पद्मिनी कोल्हापुरेसाठी का आणायचा रुचकर जेवणाचे डबे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 06:30 IST2019-07-14T06:30:00+5:302019-07-14T06:30:02+5:30

पद्मिनी कोल्हापुरे यांनी वो सात दिन या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्यावेळेसचा एक रंजकदार किस्सा द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सांगितला.

On Kapil Sharma’s show, Padmini Kolhapure recalls how Anil Kapoor got her on board for Woh Saat Din with tasty food | जाणून घ्या अनिल कपूर पद्मिनी कोल्हापुरेसाठी का आणायचा रुचकर जेवणाचे डबे

जाणून घ्या अनिल कपूर पद्मिनी कोल्हापुरेसाठी का आणायचा रुचकर जेवणाचे डबे

ठळक मुद्देनिर्मात्यांनी ‘वो सात दिन’चित्रपटासाठी माझ्या तारखा मिळवण्याची जबाबदारी अनिल कपूरवर सोपवली होती आणि या तारखा मिळवण्यासाठी अनिलने माझा अक्षरशः पिच्छा पुरवला होता. माझ्या तारखा मिळवण्यासाठी अनिल मला रुचकर भोजनाचे भले मोठे लंच बॉक्स पाठवायचा.”

द कपिल शर्मा शो हा प्रेक्षकांचा प्रचंड आवडता कार्यक्रम असून बॉलिवूडमधील मंडळी आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी या कार्यक्रमाला पहिली पसंती देतात. या कार्यक्रमात आजवर बॉलिवूडमधील अनेक कलाकार, गायक, दिग्दर्शक, निर्माते तसेच खेळ जगतातील मान्यवरांनी हजेरी लावली आहे. या आठवड्यात या कार्यक्रमात बॉलिवूडचा लाडका ‘बॅड मॅन’ शक्ती कपूर हजेरी लावणार आहे. त्याच्याबरोबर त्यांची मेव्हणी आणि बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे हजेरी लावणार आहे. या कलाकारांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसातील धमाल आठवणी या कार्यक्रमात कपिल शर्मासोबत शेअर केल्या. 

‘वो सात दिन’ चित्रपटासाठी पद्मिनी कोल्हापुरे यांच्याकडून तारखा मिळवण्याची जबाबदारी अनिल कपूरला सोपवण्यात आली होती असे म्हटले जाते. याबद्दल कपिलने पद्मिनीला विचारले असता त्यांनी सांगितले, “होय, हे खरे आहे. निर्मात्यांनी ‘वो सात दिन’ चित्रपटासाठी माझ्या तारखा मिळवण्याची जबाबदारी अनिल कपूरवर सोपवली होती आणि या तारखा मिळवण्यासाठी अनिलने माझा अक्षरशः पिच्छा पुरवला होता. माझ्या तारखा मिळवण्यासाठी अनिल मला रुचकर भोजनाचे भले मोठे लंच बॉक्स पाठवायचा.”

यावर लगेचच शक्ती कपूर म्हणाले, “वो सात दिन हा त्या काळातील एक उत्कृष्ट चित्रपट होता. या चित्रपटात अनिल कपूर आणि पद्मिनी यांची जोडी खूपच छान दिसली होती. एक तो अप्रतिम चित्रपट होता. या चित्रपटाच्या तारखा मिळवण्यासाठी अनिल पद्मिनीला चविष्ट पदार्थ खायला द्यायचा. पण आता अनिलच्या घरून येणारे टिफिन बॉक्स पद्मिनीच्या नव्हे तर माझ्या घरी येतात. अनिलची मुलगी सोनम कपूर आणि माझा मुलगा सिद्धान्त कपूर हे खूप चांगले फ्रेंड्स आहेत आणि जेव्हा कधी त्यांच्या घरी काही खास बेत असतो, तेव्हा त्यांच्या घरून आमच्याकडे मोठमोठे टिफिन बॉक्स येतात.”

द कपिल शर्मा शोमध्ये अर्चना पूरण सिंहने शक्ती कपूर यांना चित्रपट उद्योगातला एक मोठा खलनायक म्हणत त्यांची स्तुती केली आणि त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. 

Web Title: On Kapil Sharma’s show, Padmini Kolhapure recalls how Anil Kapoor got her on board for Woh Saat Din with tasty food