​कपिल शर्माची भाची समायराने केले ‘फिरंगी’चे प्रमोशन...पाहा, एक क्यूट व्हिडिओ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 12:29 IST2017-11-06T06:59:37+5:302017-11-06T12:29:37+5:30

हे. सध्या कपिल आपल्या ‘फिरंगी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. प्रमोशनचे रोजचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करण्याचा सपाटा त्याने लावला आहे. याचदरम्यान कपिलने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Kapil Sharma's niece snapshots promoted 'Furangi' ... Look, a cute video! | ​कपिल शर्माची भाची समायराने केले ‘फिरंगी’चे प्रमोशन...पाहा, एक क्यूट व्हिडिओ!

​कपिल शर्माची भाची समायराने केले ‘फिरंगी’चे प्रमोशन...पाहा, एक क्यूट व्हिडिओ!

मेडियन ते अ‍ॅक्टर असा प्रवास करणारा कपिल शर्मा पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर धम्माल करण्यास सज्ज आहे. कपिल शर्माचा ‘फिरंगी’ हा चित्रपट या महिन्याच्या अखेरिस चित्रपटगृहात झळकणार आहे. सध्या कपिल आपल्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतला आहे. प्रमोशनचे रोजचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करण्याचा सपाटा त्याने लावला आहे. याचदरम्यान कपिलने एक व्हिडिओ शेअर केला आहे. कपिलने शेअर केलेला हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओद्वारे ‘फिरंगी’तील ‘ओए फिरंगी’ या गाण्याचे प्रमोशन करण्यात आले आहे आहे. पण हे गाणे कपिलच्या आवाजात नाही तर त्याची भाची समायरा हिच्या आवाजात आहे. होय, कपिलची दीड वर्षांची भाची ‘ओए फिरंगी’ हे गाणे गाताना यात दिसतेय. समायराने इतके क्यूट गायलेयं की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही तो आवडेल.



‘उफ्फ...संपूर्ण कुटुंबच टॅलेंटेड आहे. पाहा, दीड वर्षांची भाची समायरा ‘ओए फिरंगी’ गातेय,’ असे कपिल शर्माने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले आहे. आता कपिल म्हणतो त्यात किती तथ्य आहे, हे जाणून घ्यायचे तर हा व्हिडिओ तुम्हाला पाहायलाच हवा.
गत २७ आॅक्टोबरला ‘फिरंगी’चे हे गाणे रिलीज झाले होते. केवळ यु-ट्यूबवर आत्तापर्यंत चार लाखांवर लोकांनी ते पहिले आहे. सुनिधी चौहानने हे गाणे गायले आहे आणि जितेन्द्र शाह याने या गाण्याला संगीत दिले आहे. चित्रपटाचे ट्रेलरही इंटरनेटवर सुपरहिट झाले आहे.

ALSO READ: ​‘त्या’ दिवशी कपिल शर्माने केला होता आत्महत्येचा विचार!

‘फिरंगी’ हा कपिलचा दुसरा चित्रपट आहे. याआधी २०१५ मध्ये कपिलचा ‘किस किस को प्यार करूं’ हा चित्रपट रिलीज झाला होता. आता कपिल ‘फिरंगी’ घेऊन येतो आहे. हा चित्रपट कपिलने स्वत: प्रोड्यूस केलेला आहे. सूत्रांच्या मते, यात प्रेमाचा एक कोणही आहे. कपिल शर्मा एका देशी मुलीच्या प्रेमात पडतो. पण ही मुलगी पुढे इंग्रजी भाषेच्या प्रेमात पडते. आपले प्रेम मिळवण्याच्या नादात कपिल इंग्रजी राजवटीविरोधात मैदानात उतरतो, असे या चित्रपटाचे कथानक असल्याचे कळतेय. या चित्रपटात दोन नायिका आहेत. एक तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्ता आणि दुसरी मोनिका गिल. दोघीही लीड भूमिकेत आहे. कपिलचा ‘जिगरी यार’ राजीव धिंगरा या चित्रपटाचे दिग्दर्शन करतो आहे. आत्तापर्यंत राजीवने ‘लव पंजाब’ आणि ‘अंग्रेज’ हे दोन हिट सिनेमे दिले आहेत.

Web Title: Kapil Sharma's niece snapshots promoted 'Furangi' ... Look, a cute video!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.