‘द कपिल शर्मा शो’ मध्ये घर नाही असेल गल्ली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 07:38 IST2016-03-06T14:38:48+5:302016-03-06T07:38:48+5:30
‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’द्वारे प्रेक्षकांचे अखंड मनोरंजन केल्यानंतर कॉमेडियन सुपरस्टार कपिल शर्मा ‘द कपिल शर्मा शो’ हा सर्वांर्थाने नवा ...

‘द कपिल शर्मा शो’ मध्ये घर नाही असेल गल्ली
‘ ॉमेडी नाइट्स विद कपिल’द्वारे प्रेक्षकांचे अखंड मनोरंजन केल्यानंतर कॉमेडियन सुपरस्टार कपिल शर्मा ‘द कपिल शर्मा शो’ हा सर्वांर्थाने नवा शो घेऊन येतो आहे. नवा या अर्थाने की, हा शो नव्या थीमवर आधारित असेल. ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’मध्ये कपिलचे घर दाखवले होते. पण ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिलची गल्ली असणार आहे. या गल्लीत घडणाºया गमती-जमती, विनोद अशी या शोची थीम आहे. ‘कॉमेडी नाइट्स विद कपिल’मध्ये पलकची भूमिका साकारणरºया किकू शारदाने याबाबतचे संकेत दिले. नव्या शोमध्ये कुटुंबाची थीम नसेल. तर एक गल्ली असेल आणि या गल्लीत राहणारे वेगवेगळे लोक असतील,असे किकू म्हणाला. अर्थात याबाबत अधिक माहिती देण्यास त्याने नकार दिला. कारण अहो, किकू सगळेच सांगेल तर मग २३ एप्रिलला काय पाहाल?