आता परदेशातही कपिलची हवा... थेट कॅनेडामध्ये सुरू केलं 'कॅप्स कॅफे', असा आहे मेन्यू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 11:47 IST2025-07-07T11:46:47+5:302025-07-07T11:47:43+5:30

कपिल शर्माने त्याच्या पत्नीसोबत कॅनडामध्ये एक नवीन व्यवसाय सुरू केला आहे.

Kapil Sharma Ginni Opened Restaurant In Canada See The Glimpse | आता परदेशातही कपिलची हवा... थेट कॅनेडामध्ये सुरू केलं 'कॅप्स कॅफे', असा आहे मेन्यू!

आता परदेशातही कपिलची हवा... थेट कॅनेडामध्ये सुरू केलं 'कॅप्स कॅफे', असा आहे मेन्यू!

Kapil Sharma Opened Restaurant In Canada: प्रसिद्ध कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा सध्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' च्या तिसऱ्या सीझनमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र, अभिनय आणि कॉमेडीच्या पलीकडे जाऊन कपिलने आता नव्या क्षेत्रात उडी घेतली आहे. कपिल आणि त्याची पत्नी गिन्नी यांनी कॅनडामध्ये 'Caps Cafe' नावाचे एक खास रेस्टॉरंट सुरू केले आहे.

कपिल शर्माचं गुलाबी आणि पांढऱ्या रंगांच्या आकर्षक थीममध्ये सजवलेले हे कॅफे सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. गिन्नीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये कॅफेची सुंदर झलक शेअर केली होती.  या ठिकाणी मिळणाऱ्या पदार्थांच्या किंमती थोड्याशा महाग आहेत. एका व्हिडीओनुसार, येथे ५०० रुपयांपेक्षा कमी दरात काहीही मिळत नाही, त्यामुळे लोकांनी याची तुलना स्टार कॅफेंसोबत केली आहे. कपिलच्या या नव्या प्रवासाबद्दल त्याचे सहकारी आणि मित्रसुद्धा खूप आनंद व्यक्त करत आहेत. किकू शारदा, बलराज सियाल यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.


कपिल शर्माचं नाही तर असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे फक्त अभिनयावर अवलंबून न राहता उद्योगजगतात यशस्वी झालेत. आपल्या लोकप्रियतेचा उपयोग करून हे कलाकार विविध व्यवसायांमधून मोठी कमाई करत आहेत. यात शिल्पा शेट्टी, सुनील शेट्टी, अर्शद वारसी असे अनेक कलाकार आहेत. शिल्पा शेट्टीचा 'Bastian' नावाचा रेस्टॉरंट ब्रँड मुंबईत लोकप्रिय आहे. सुनील शेट्टी हाच एक यशस्वी उद्योजक आहे. तो 'Hearth House' या किचन ब्रँडसह फिटनेस, वेलनेस आणि रिअल इस्टेट क्षेत्रातही सक्रिय आहे. तर अर्शद वारसीनेही 'The Bohri Kitchen' मध्ये गुंतवणूक केली आहे, जे एक लोकप्रिय फूड स्टार्टअप आहे.
 

Web Title: Kapil Sharma Ginni Opened Restaurant In Canada See The Glimpse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.