​रणवीर सिंग नव्हे तर अर्जुन कपूर साकारणार कपिल देव यांची भूमिका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2017 11:20 IST2017-09-23T05:48:10+5:302017-09-23T11:20:53+5:30

१९८३ हे वर्षं क्रिकेट रसिकांसाठी सगळ्यात चांगले वर्षं होते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण याच वर्षी आपल्याला ...

Kapil Dev's role to play Arjun Kapoor, not Ranveer Singh? | ​रणवीर सिंग नव्हे तर अर्जुन कपूर साकारणार कपिल देव यांची भूमिका?

​रणवीर सिंग नव्हे तर अर्जुन कपूर साकारणार कपिल देव यांची भूमिका?

८३ हे वर्षं क्रिकेट रसिकांसाठी सगळ्यात चांगले वर्षं होते असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. कारण याच वर्षी आपल्याला पहिला वर्ल्ड कप मिळाला. वर्ल्ड कप जिंकल्याचा भारतीयांना झालेला आनंद हा शब्दांत व्यक्त केला जाऊ शकत नाही. कपिल देव आणि त्यांच्या टीमने लोकांना हा आनंद मिळवून दिला होता. वेस्टइंडिजला हरवून कपिल देव यांनी आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला वर्ल्डकप मिळवून दिला होता. कपिल देव यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहेत. कबीर खान यांनी न्यूयॉर्क, एक था टायगर यांसारखे हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. 
कपिल देव यांच्या आयुष्यावर बनवण्यात येणाऱ्या चित्रपटात कपिल देव यांच्या भूमिकेत रणवीर सिंग असणार असल्याची चर्चा होती. पण आता रणवीर सिंग नव्हे तर अर्जुन कपूर कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार असल्याचे म्हटले जात आहे. 
केवळ रणवीर सिंगच नव्हे तर हृतिक रोशनला देखील कपिल देव यांच्या भूमिकेसाठी विचारण्यात आले होते. पण या सगळ्यात आता अर्जुन कपूरने बाजी मारली असून कपिल देव यांच्या भूमिकेत तो झळकणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटाची निर्मिती फँटम फिल्मस आणि विष्णू वर्धन इंदूरी हे करणार आहेत.
कपिल देव यांनी एक क्रिकेटर म्हणून चांगलेच नाव मिळवले. त्यांच्या जिद्दीची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कपिल देव यांच्या भूमिकेसाठी प्रोडक्शन हाऊस गेल्या कित्येक महिन्यापासून चांगल्या अभिनेत्याच्या शोधात आहे. एखादा चांगला अभिनेताच कपिल देव यांच्या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकतो असे कपिल देव यांचे म्हणणे आहे.
कपिल देव यांच्या चित्रपटाची अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. त्यावेळी आपल्याला कपिल देव यांच्या भूमिकेत कोण झळकणार याविषयी नक्कीच कळेल. पण तुम्हाला हृतिक रोशन, रणबीर सिंग आणि अर्जुन कपूर यांच्यामध्ये कोणाला कपिल देव यांच्या भूमिकेत पाहायला जास्त आवडेल हे कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. 

Also Read : अर्जुन कपूर का टाळतोय परिणीती चोप्रासोबत पुन्हा काम करणे?

Web Title: Kapil Dev's role to play Arjun Kapoor, not Ranveer Singh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.