कन्नड सुपरस्टार दर्शनच्या तोंडावर फेकली चप्पल; Video सोशल मीडियावर व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 16:35 IST2022-12-19T16:34:36+5:302022-12-19T16:35:08+5:30

Kannada Actor Darshan: अभिनेता दर्शन त्याचा आगामी चित्रपट 'क्रांती'च्या प्रमोशनसाठी गेला असता ही घटना घडली.

Kannada Superstar Darshan's face thrown with a slipper; Video viral on social media | कन्नड सुपरस्टार दर्शनच्या तोंडावर फेकली चप्पल; Video सोशल मीडियावर व्हायरल...

कन्नड सुपरस्टार दर्शनच्या तोंडावर फेकली चप्पल; Video सोशल मीडियावर व्हायरल...

Kannada Actor Darshan: चित्रपटातील कलाकारांना चाहत्यांच्या प्रेमासह कधी-कधी नाराजीचाही सामना करावा लागतो. अनेकदा कलाकार आणि चाहत्यांमध्ये वाद झाल्याचेही आपण ऐकतो. यामुळे अनेकदा त्यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यासोबतच सार्वजनिक ठिकाणी विरोधाचा सामना करावा लागतो. अशाच प्रकारची घटना कन्नड अभिनेता दर्शन (Kannada Actor Darshan) सोबत घडली आहे.

कन्नड सूपरस्टार दर्शन त्याची अपकमिंग फिल्म 'क्रांती'च्या प्रमोशनसाठी कर्नाटकातील होसपेटे येथे आला होता. यावेळी त्याला चाहत्यांच्या प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. यावेळी गर्दीतून कुणीतरी दर्शनच्या अंगावर चप्पल फेकली. या चप्पलफेकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओ व्हायरल

 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना 18 डिसेंबर रोजी घडली. अभिनेता दर्शन होसपेटेमध्ये आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेला होता, यावेळी तो स्टेजवरुन बोलत असताना खालून एकाने त्याच्यावर चप्पल फेकली. यावेळी चप्पल थेट दर्शनच्या तोंडावर लागली. यानंतर लगेच दर्शन त्या कार्यक्रमातून काढता पाय घेतो. ही चप्पलफेक नेमकी कुणी केली, याबाबत माहिती मिळू शकली नाही.

चित्रपट कधी रिलीज होणार?
दर्शनचा आगामी चित्रपट 'क्रांती' एक अॅक्शन ड्रामा चित्रपट असून, यात दर्शनसोबत अभिनेत्री रचिता राम आहे. वी हरिकृष्ण याने हा चित्रपट डायरेक्ट केला आहे. पुढील वर्षी 26 जानेवारी 2023 ला हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Web Title: Kannada Superstar Darshan's face thrown with a slipper; Video viral on social media