कन्नड अभिनेता दुनिया विजयविरोधात मुलीनेच दाखल केला मारहाणीचा गुन्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2018 14:21 IST2018-10-24T14:20:50+5:302018-10-24T14:21:49+5:30

दुनिया विजयवर त्याच्या स्वत:च्याच मुलीने गंभीर आरोप करत, तक्रार दाखल केली आहे.

Kannada actor Duniya Vijay booked on charge of assaulting daughter | कन्नड अभिनेता दुनिया विजयविरोधात मुलीनेच दाखल केला मारहाणीचा गुन्हा!

कन्नड अभिनेता दुनिया विजयविरोधात मुलीनेच दाखल केला मारहाणीचा गुन्हा!

 कन्नड अभिनेता दुनिया विजय अलीकडे एका अपहरणाच्या प्रकरणामुळे चर्चेत आला होता. जिम ट्रेनरचे अपहरण करून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अलीकडे त्याला अटक करण्यात आली होती. आता दुनिया विजयवर त्याच्या स्वत:च्याच मुलीने गंभीर आरोप करत, तक्रार दाखल केली आहे. होय, दुनिया विजयची मुलगी मोलिका हिने याप्रकरणी पोलिसांत धाव घेतली आहे. दुनिया विजय, त्याची दुसरी पत्नी किर्ती गौडा आणि अन्य तिघांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप तिने केला आहे. या मारहाणीत मोनिकाला गंभीर दुखापत झाली आहे.
तक्रारीनुसार, गत सोमवारी मोनिका वडिलांच्या घरी आपले काही सामान घेण्यासाठी गेली असता विजय, त्याची पत्नी व अन्य तिघांनी तिला घरात पाऊल ठेवताच शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली.
‘मी घरात जाताच त्यांनी मला मारहाण केली. त्यांनी मला लाथांनी मारले, माझे केस धरले. या मारहाणीत माझे डोके भिंतीवर आपटले, माझ्या हाताला दुखापत झाली. मी कशीबशी त्यांच्या तावडीतून निसटले आणि रूग्णालयात गेले़ यानंतर मी पोलिसांत तक्रार नोंदवली,’असे मोनिकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान दुनिया विजयने हे आरोप धुडकावून लावत मोनिका खोटे बोलत असल्याचा प्रतिआरोप केला आहे. त्याने एक फुटेजही रिलीज केले आहे. त्यात मोनिका जोरजोरात दरवाजा ठोठावत आहे आणि कुणीच दरवाजा उघडत नाही हे बघून घरावर दगडफेक करताना दिसतेय. मोनिका ही दुनिया विजयच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे.

Web Title: Kannada actor Duniya Vijay booked on charge of assaulting daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.