कंगना-शाहिद यांच्यांत दुरावा : रंगूनचे अलविदा गाणे रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 20:11 IST2017-02-14T14:31:12+5:302017-02-14T20:11:55+5:30

रंगून मध्ये कंगना व शाहिद यांच्यात असे काही झाले आहे ज्यामुळे त्यांना एकमेकांना अलविदा म्हण्याची वेळ आली आहे.

Kangna-Shahid's Duaarwa: Release song of Rangoon | कंगना-शाहिद यांच्यांत दुरावा : रंगूनचे अलविदा गाणे रिलीज

कंगना-शाहिद यांच्यांत दुरावा : रंगूनचे अलविदा गाणे रिलीज

िनेत्री कंगना राणौत, शाहिद कपूर व सैफ अली खान यांच्या भूमिका असलेल्या रंगून या चित्रपटातील ‘अलविदा’ हे गाणे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी रिलीज करण्यात आले. रंगून मध्ये कंगना व शाहिद यांच्यात असे काही झाले आहे, ज्यामुळे त्यांना एकमेकांना अलविदा म्हण्याची वेळ आली आहे. रंगून हा चित्रपट वॉर मुव्ही नसून लव्ह ट्रँगल असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. अलविदा या गाण्यातून हे जाणविते. 

अलविदा या गाण्यात सैनिक नवाब मलिक आणि मिस जुलीच्या प्रेम कथेला अलविदा म्हण्याची वेळ का आली हे तर चित्रपट पाहिल्यावरच कळेल. अलविदा गाण्यातून दोघांना एकमेकांबाबत असलेली प्रेमाची ओढ दिसून येते. प्रेमात अलविदा म्हणताना होणारे दु:ख गायक अरिजीत सिंग आपल्या आवाजातून व्यक्त करण्यात यशस्वी झाला आहे. या गाण्याची शब्दरचना गुलझार यांनी केली असून विशाल भारद्वाज याचे संगीत मनाचा ठाव घेणारे ठरते. आपल्या प्रेमापासून दूर आल्यावर सैफ कंगना आधार देण्याचा प्रयत्न करतो आहे. असे या गाण्यातून दाखविण्यात आले आहे. 



दरम्यान रंगूनच्या प्रमोशनाचा कंगना व शाहिद यांनी धडाका लावला आहे. शाहिदने व्हॅलेंटाईन डेला इन्स्टाग्रामवरून शुभेच्छा दिल्या आहेत. ‘रंगून’मध्ये कंगना मिस ज्युलिया नामक कॅ रेक्टर साकारते आहे. जी डान्सर आहे, सिंगर आहे. आयुष्यावर भरभरून प्रेम करणारी बिनधास्त ज्युलिया एकावेळी दोन व्यक्तींवर जिवापाड प्रेम करते. एकाचवेळी दोन व्यक्तींवर जिवापाड प्रेम करण्यात तिला काहीही गैर वाटत नाही.  यापूर्वी इतकी बोल्ड व्यक्तिरेखा कंगनाने साकारलेली नव्हती. या चित्रपटात कंगनाने अनेक बोल्ड सीन्सही दिले आहेत. 

Web Title: Kangna-Shahid's Duaarwa: Release song of Rangoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.