कंगना राणौतने विकत घेतला 'या' कामासाठी २० कोटींचा बंगला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2017 15:43 IST2017-10-03T10:08:42+5:302017-10-03T15:43:02+5:30

आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेली कंगना राणौत पुन्हा एकदा एका कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी कंगना आपल्या व्यक्तव्यामुळे नाही तर ...

Kangna Ranaut bought 20 crores bungalow for 'this' | कंगना राणौतने विकत घेतला 'या' कामासाठी २० कोटींचा बंगला...

कंगना राणौतने विकत घेतला 'या' कामासाठी २० कोटींचा बंगला...

ल्या वक्तव्यामुळे चर्चेत असलेली कंगना राणौत पुन्हा एकदा एका कारणामुळे चर्चेत आली आहे. यावेळी कंगना आपल्या व्यक्तव्यामुळे नाही तर वेगळ्याच कारणामुळे प्रकाशझोतात आली आहे. कंगनाने नुकताच वांदऱ्याच्या  पाली हिल परिसरात एक बंगला विकत घेतला आहे. त्या ठिकाणी ती स्वतःचे प्रॉडकशन हाऊस सुरु करण्याचा विचार करते आहे. या बाबत तिच्या मॅनेजरला विचारले असता त्याने सांगितले या बंगल्याचा उपयोग कंगना आपल्या प्रॉडक्शन हाऊस म्हणजेच 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' चित्रपटाच्या ऑफिससाठी करणार आहे. वांद्रेमधील नर्गिस दत्त मार्गावर असलेल्या ह्या ४ मजली बंगला विकत घेतला आहे ज्याची किंमत २० कोटी ७ लाख एवढी आहे.  या प्रॉपर्टीचे रेजिस्ट्रेशन सप्टेंबरमध्ये झाले. कंगना सध्या 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे हा चित्रपट राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारीत आहे.

कंगनाचा काही दिवसांपूर्वीच 'सिमरन' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होतो. यातील कंगनाच्या अभिनयाचे कौतुक देखील झाले होते.  कंगनाने आपल्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव माणिकर्णिका फिल्म्स असे ठेवले आहे पण या प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून ती चित्रपटाची निर्मिती करणार आहे की नाही हे अजून समजू शकलेले नाही.  फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखती दरम्यान कंगना म्हणाली होती की, चित्रपट तेजुमध्ये अभिनय, दिग्दर्शन आणि निर्मितीचे श्रेय सगळे मी स्वत:च घेणार आहे. यावरुन एक तर निश्चित झाले आहे तेजू हा कंगनाच्या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट असणार आहे. चित्रपट तेजूचे प्री -प्रॉडक्शन चे काम २०१८ मध्ये सुरू होणार आहे.
कंगना चे लागोपाठ ४चित्रपट म्हणजेच आय लव्ह इन वाय, कट्टी बट्टी, रंगून आणि सिमरन येऊन गेले पण चारही चित्रपट बॉक्स ऑफिस वरसपशेल आपटले.


ALSO READ : OMG!! कंगना राणौत अडचणीत; आदित्य पांचोलीने पाठवली मानहानीची नोटीस!

पण गेल्या काही काळापासून कंगना आपल्या वक्तव्या वरून फार चर्चेत आली आहे. एक टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने अभिनेता आदित्य पंचोली आणि ह्रतिक रोशनवर अनेक आरोप केले. यानंतर आदित्य पंचोलीने तिच्यावर अब्रु नुकसानीचा  दावा ही ठोकला आणि तिला यासंदर्भात नोटीसदेखील पाठवली आहे. त्या नोटीसचे उत्तर कंगनाचे वकील रिजवान सिद्धीकीनी दिले आहे.

Web Title: Kangna Ranaut bought 20 crores bungalow for 'this'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.