​कंगना राणौतची पुन्हा एकदा करण जोहरवर मात! म्हणे, कुणी माझ्यासाठी दरवाजे उघडण्याची गरज नाही!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 13:15 IST2018-01-10T07:45:43+5:302018-01-10T13:15:43+5:30

गतवर्षी कंगना राणौत आणि करण जोहर यांचे वाक्युद्ध चांगलेच गाजले होते. दोघांनीही एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली नव्हती. ...

Kangna Ranao beat Karan Johar again! Say, no one needs to open doors for me !! | ​कंगना राणौतची पुन्हा एकदा करण जोहरवर मात! म्हणे, कुणी माझ्यासाठी दरवाजे उघडण्याची गरज नाही!!

​कंगना राणौतची पुन्हा एकदा करण जोहरवर मात! म्हणे, कुणी माझ्यासाठी दरवाजे उघडण्याची गरज नाही!!

वर्षी कंगना राणौत आणि करण जोहर यांचे वाक्युद्ध चांगलेच गाजले होते. दोघांनीही एकमेकांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडली नव्हती. या वाक्युद्धाचे कारण होते, नेपोटिजमचा वाद अर्थात बॉलिवूडमधील घराणेशाहीचा मुद्दा. होय, करणच्याच ‘कॉफी विद करण’ या चॅट शोमध्ये जावून कंगनाने त्याला ‘मुव्ही माफिया’म्हटले होते. कंगनाचा हा घाव करणच्या चांगल्याच जिव्हारी लागला होता. तेव्हापासून या मुद्यावर करण व कंगना या दोघांमध्ये चांगलीच तणाताणी सुरु होती. मी कंगनाला त्रासलो आहे. ती कायम ‘विक्टिम कार्ड’ पुढे करते. तिला इतका त्रास होते असेल तर तिने बॉलिवूड सोडावे, असे करणने म्हटल्यावर तर हा वाद विकोपाला पोहोचला होता. गतवर्षी न्यूयॉर्कमध्ये  रंगलेल्या  आयफा अवार्ड2017मध्येही याचा एक अध्याय गाजला होता.  आयफा अवार्ड होस्ट करणारे सैफ अली खान, वरूण धवन व करण जोहर यांनी या सोहळ्याच्या मंचावर कंगना राणौत चांगलेच डिवचले होते. पण कदाचित आता हा संपूर्ण वाद मागे सोडून करण व कंगना एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये एकत्र दिसणार आहेत.



ALSO READ : कंगना राणौत झाली ‘कंगाल’! ‘महाग’ पडले हृतिक रोशनसोबतचे वैर!!

‘इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार’ या आगामी शोमध्ये कंगना व करण एकत्र येणार आहेत. कंगना व करण दोघांनीही याचे संकेत दिले आहेत. काही दिवसांपूर्वी करणने, या शोमध्ये कंगनाचे स्वागतचं होईल. आमचे मन खूप मोठे आहे. आमचे दरवाजे कंगनासाठी उघडे आहेत, असे सांगितले होते. करणच्या या विधानावर कंगनानेही प्रतिक्रिया दिली आहे. मी केवळ ‘इंडियाज् नेक्स्ट सुपरस्टार’ शोमध्ये जाण्याचा विचार करतेय. ही एक प्रोफेशनल गोष्ट आहे. कारण याचे मला पैसे मिळतात. करण माझ्यासोबत काम करण्यास तयार आहे, ही चांगली गोष्ट आहे. कदाचित हळूहळू सगळे ठीक होत आहे, असे कंगना म्हणाली. अर्थात ती इथेच थांबली नाही तर याहीवेळी तिने करणला मात देण्याचा प्रयत्न केला. करणने माझे स्वागत केलेय, हे पाहून मला आनंद झालाय. पण मी जिथे कुठे जाते, त्यासाठी लागणारी पुण्याई मी कमावलीय. मी स्वत:ला सिद्ध केलेय. कुणालाही माझ्यासाठी दरवाजे उघडण्याची गरज नाही. मी स्वत: माझ्यासाठी दरवाजे उघडू शकते, असे कंगना म्हणाली. 

Web Title: Kangna Ranao beat Karan Johar again! Say, no one needs to open doors for me !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.