ऋुतिकच्या वादानंतर कंगनाची सोशल मिडियापासून ‘फारकत’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:41 IST2016-02-04T05:20:50+5:302016-02-07T11:41:27+5:30
अभिनेता ऋुतिक रोशनसोबत अभिनेत्री कंगना रनावत हिचा वादविवाद झाल्यापासून कंगनाने सोशला मिडियापासून चार हात लांब राहणे पसंत केले आहे; ...

ऋुतिकच्या वादानंतर कंगनाची सोशल मिडियापासून ‘फारकत’
अभिनेता ऋुतिक रोशनसोबत अभिनेत्री कंगना रनावत हिचा वादविवाद झाल्यापासून कंगनाने सोशला मिडियापासून चार हात लांब राहणे पसंत केले आहे; मात्र तिने सोशल मिडिया हे स्वत:चे मत मांडण्याचे उत्तम माध्यम असल्याचे सांगितले असून ‘मी जरी जास्त सोशल मिडियावर झळकत नसली तरी माझे सोशल साइटस वर बारकाईने लक्ष असते’ असे कंगना सांगते. कारण याचा एक फायदा होतो की, आपल्याविषयी काही चुकीची बातमी किंवा चर्चा अथवा अफवा पसरत असेल तर त्याबाबत आपल्याला आपले मत मांडता येते; मात्र तिने पुढे बोलताना हे देखील स्पष्ट केले की, या सोशल मिडियापासून काही नुकसान देखील आहे. यामुळे आपल्याला काही लोकांची टीका देखील सहन करावी लागते, असे कंगना म्हणाली. ‘मी माझ्या जीवनात नकारात्मक बाबी अथवा विचारांपासून नेहमीच स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करते आणि हेच एक कारण आहे की, मी सोशल मिडीयापासून काही अंतर राखून आहे.’ नुकतेच अभिनेता ऋुतिक रोशन याने एका ट्विटद्वारे अप्रत्यक्षपणे कंगना वर टिका केली होती; या टीकेचे उत्तर देखील कंगनाने हे त्याच शैलीत दिले होते. एका मुलाखतीत कंगना रनावत हिने इशाºयांमध्ये का होईना ऋुतिक रोशन सोबत असलेल्या संबंधाची बाब सकारात्मक असल्याचे स्विकारले होते. त्याच बाबीवर ऋुतिकने नाराज होऊन सदर बाब पुर्णत वायफळ असल्याचे सांगितले होते.
