कंगनापासून दूर राहा...! करण जोहरला मिळाली तंबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2020 15:54 IST2020-01-30T15:54:20+5:302020-01-30T15:54:59+5:30
कंगना राणौत आणि करण जोहर यांच्यातील वाद नवा नाही. पण अलीकडे कंगनाला पद्मश्री मिळाल्यानंतर करण सगळे वाद विसरून मोठ्या मनाने कंगनाचे कौतुक करताना दिसला. पण...

कंगनापासून दूर राहा...! करण जोहरला मिळाली तंबी
कंगना राणौत आणि करण जोहर यांच्यातील वाद नवा नाही. पण अलीकडे कंगनाला पद्मश्री मिळाल्यानंतर करण सगळे वाद विसरून मोठ्या मनाने कंगनाचे कौतुक करताना दिसला. कंगना एक उत्तम अभिनेत्री आहे. तिला पद्मश्री मिळाल्याचा आनंद आहे, असे करण म्हणाला. इतकेच नाही तर माझ्याकडे एखादी चांगली स्क्रिप्ट असेल तेव्हा मी कंगनाला नक्की कॉल करेल, असेही तो म्हणाला. पण करणचे हे कौतुक कंगनाची बहीण रंगोलीला जराही रूचले नाही. ती जाम भडकली. इतकेच नाही तर करणला कंगनापासून लांब राहण्याची तंबीही तिने दिली.
रंगोलीने एकापाठोपाठ एक असे अनेक ट्वीट करत करणला फैलावर घेतले. ‘करण जोहरजी, तू असा बोलतोय जणू तू कॉल केल्याबरोबर कंगना तुझ्याकडे पळत येईल. भाई साहब, तुला व मला वाटून काय फायदा. कंगनाला तर चांगली स्क्रिप्ट हवी. तुझ्याकडे खरच तिच्या लायक चांगली स्क्रिप्ट कधी असेल?’, असे खोचक ट्वीट रंगोलीने केले.
यानंतरही ती थांबली नाही. दुस-या ट्वीटमध्ये तिने लिहिले,‘कंगनाने ऐ दिल है मुश्किल हा तुझा अखेरचा सिनेमा बघितला होता आणि हा सिनेमा पाहून ती जाम भडकली होती. हिरोईनची किमोथेरपी सुरु आहे आणि स्टॉकर क्रीपी हिरो तिच्यासोबत बळजबरी करतो, हे सगळे पाहून कंगना अनेक दिवस धक्क्यात होती. करण जोहरजी, अशी स्क्रिप्ट घेऊन कंगनाकडे याल तर तुम्हाला देवही वाचवू शकणार नाही. प्लीज कंगनापासून दूरच राहा, यातच सगळ्यांचे भले आहे,’असेही तिने लिहिले.
रंगोलीच्या या ट्वीटवर करणने अद्याप कुठलेही उत्तर दिलेले नाही. आता तो काय उत्तर देतो ते बघूच.