सुशांत व अंकिताच्या ब्रेकअपसाठी हे लोक जबाबदार, कंगनाची बहिण रंगोली चंडेलने केला आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 13:47 IST2020-06-22T13:46:40+5:302020-06-22T13:47:19+5:30

कंगना रानौतने सुशांत राजपूतच्या निधनानंतर सोशल मीडियावर बरेच धक्कादायक खुलासे केले होते. त्यानंतर आता तिची बहिण रंगोल चंडेल हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे ज्यात तिने काही लोकांवर आरोप केलेत.

Kangana's sister Rangol Chandel alleges that these people were responsible for Sushant and Ankita's breakup | सुशांत व अंकिताच्या ब्रेकअपसाठी हे लोक जबाबदार, कंगनाची बहिण रंगोली चंडेलने केला आरोप 

सुशांत व अंकिताच्या ब्रेकअपसाठी हे लोक जबाबदार, कंगनाची बहिण रंगोली चंडेलने केला आरोप 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येच्या वृत्ताने बॉलिवूडसोबत त्याच्या चाहत्यांना धक्का बसला, एकीकडे सोशल मीडियावर त्याच्या निधनावर हळहळ व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे घराणेशाहीला विरोध होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी कंगना रानौत सुशांतच्या निधनावर दुःख व्यक्त करत नेपोटिझमवर पुन्हा एकदा भाष्य केले होते. तसेच त्यात तिने बरेच धक्कादायक खुलासे केले होते. त्यानंतर आता तिची बहिण रंगोली चंडेलने देखील सूशांतच्या आत्महत्या प्रकरणी इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे.

रंगोली चंडेलने सुशांत सिंग राजपूत, अंकिता लोखंडे व त्याचा मित्र संदीप सिंगचा फोटो शेअर करत लिहिले की, यापूर्वी संदीप सिंगने सुशांतच्या आठवणींना उजाळा देत हा फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये त्याने आपल्या मित्राच्या आठवणीत खूप काही लिहिले होते. संदीपच्या या पोस्टवर प्रतिक्रिया देत रंगोलीने लिहिले की, एकदम योग्य लिहिलंय संदीप. सुशांतने एक मोठा महागडा पीआर हायर केला होता. जो मुव्ही माफियांसाठी काम करत होता. त्या पीआरने सुशांतला सांगितले होते की त्याच्यासाठी दुसरा पार्टनर शोधावे लागेल. इथे लोक प्रेम नाही करत कारण इथे लोक फक्त ब्रॅण्डिंगसाठी प्रेमात असतात. स्वतःसाठी वेगळा ब्रॅण्ड बनव.

रंगोलीने पुढे लिहिले की, त्याच्या महागड्या पीआरने सांगितले की हा तो वेळ आहे जिथे तुला तुझ्या कमतरतेला विसरावे लागेल आणि कोणत्यातरी सुपर मॉडेलला डेट करावे लागेल. रणवीर किंवा रणबीर सारखे कोणाबरोबर तरी कनेक्शन बनव. जिला मोठे फिल्मी बॅकग्राउंड असेल. हे तुझ्या इमेजसाठी ठीक नाही की तू कोणत्यातरी टीव्ही अभिनेत्रीसोबत मालाडमध्ये राहतो आहे. तुलादेखील लंबी रेसमध्ये सहभागी व्हायचे असेल तर त्याच्यासारखे करावे लागेल, त्यांच्यासारखे वागावे लागेल. नाही तर तू स्ट्र्गलिंग एक्टर बनून राहशील.

रंगोलीने पुढे लिहिले की, अंकिता व सुशांतने नवीन घर विकत घेतले होते पण सुशांत ते सोडून गेला. त्यामुळे अंकिता पूर्णपणे तूटून गेली होती. पण त्या लोकांनी त्याच्या कणा मोडून टाकला. तो वांद्रे येथे शिफ्ट झाला आणि नकली मित्रांनी त्याला घेरले. त्याने कोणत्यातरी सुपरमॉडेलला डेट करायला सुरूवात केली जी कुठेतरी हरवून गेली. जेव्हा मला कॉमन फ्रेंडकडून हे समजले तेव्हा मी विचार केला की हा किती दिवस काम करेल. तेच झाले. याचा अर्थ त्याला हे पटत नव्हते. त्या फेक पीआर व मित्रांनी त्याला सोडले. तो एकटा आणि डिप्रेस्ड राहिला. त्यांनी या संधीचा फायदा घेतला आणि त्याला बॅन करून आणखीन त्रास दिला. तू बरोबर आहे. काश तिथे हे सगळे थांबवता आले असते.

Web Title: Kangana's sister Rangol Chandel alleges that these people were responsible for Sushant and Ankita's breakup