​कंगना राणौतचा ‘बाहुबली’ प्रभाससोबत रोमान्स अन् मग मोठे भांडण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2017 13:06 IST2017-05-10T07:36:29+5:302017-05-10T13:06:29+5:30

प्रभासचा ‘बाहुबली2’ रिलीज झाल्यानंतर सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा आहे. रिलीजनंतर काही आठवडे होत आले, पण ‘बाहुबली2’च्या कमाईचा आकडा कमी ...

Kangana Ranaut's 'Bahubali' romance with Prabhas and then a big fight! | ​कंगना राणौतचा ‘बाहुबली’ प्रभाससोबत रोमान्स अन् मग मोठे भांडण!

​कंगना राणौतचा ‘बाहुबली’ प्रभाससोबत रोमान्स अन् मग मोठे भांडण!

रभासचा ‘बाहुबली2’ रिलीज झाल्यानंतर सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा आहे. रिलीजनंतर काही आठवडे होत आले, पण ‘बाहुबली2’च्या कमाईचा आकडा कमी झालेला नाही. एकीकडे ‘बाहुबली2’चा फिवर कायम असताना दुसरीकडे लोक प्रभासची प्रशंसा करताना थकत नाहीयेत. आता या यादीत अभिनेत्री कंगना राणौत हिचे नावही सामील झाले आहे. होय, सध्या कंगनाचे ‘प्रभास’ प्रेम अगदी ऊतू चाललेले आहे. केवळ एवढेच नाही तर अगदी गंमती-गमतीत तिने एक वेगळेच रहस्य उघड केले आहे.



कंगनाने प्रभाससोबत काम केलेय, हे तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल. पण एका तेलगू चित्रपटात कंगना व प्रभास एकत्र दिसले होते. कंगनाने उघड केलेले रहस्य हे नाही, तर वेगळेच आहे. कंगनाने उघड केलेले रहस्य आहे, प्रभाससोबतचे तिचे भांडण. होय, चित्रपटाचे शूटींग सुरु असतानाच दोघांचेही एकमेकांसोबत खटके उडायचे. पण चित्रपट पूर्ण झाला अन् दोघांमध्ये इतके कडाक्याचे भांडण झाले की, दोघांनीही परस्परांशी बोलणे बंद केले. खुद्द कंगनाने ही माहिती दिली आहे. 
सध्या कंगना प्रभासची प्रशंसा करताना थकत नाहीये. प्रभासचे शानदार काम पाहून मला त्याचा अभिमान वाटतो आहे. तो खरोखरच खूप चांगला आहे, असे  तिने म्हटले.
‘क्वीन’ व ‘बाहुबली’पूर्वी कंगना व प्रभासने एकत्र काम केले होते. पुरी जगन्नाथ यांच्या ‘ एक निरंजन’ या चित्रपटात हे एकत्र दिसले होते. या चित्रपटाची संपूर्ण कथा प्रभासभोवती गुंफली गेली होती. जो गुन्हेगारांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करतो. कंगनाने त्यावेळी यशाची चव चाखणे सुरु केले होते.  ‘एक निरंजन’ हा चित्रपट २००८ मध्ये ‘फॅशन’ या चित्रपटानंतर रिलीज झाला होता. कंगनाने तेलगूसह तामिळ चित्रपटांतही काम केले आहे.

Web Title: Kangana Ranaut's 'Bahubali' romance with Prabhas and then a big fight!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.