मेरी राख गंगा में मत बहाना...! कंगना राणौतने शेअर केला व्हिडीओ, खूप होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2020 15:17 IST2020-12-27T15:16:36+5:302020-12-27T15:17:21+5:30

कंगनाने कवितेतून सांगितली अंतिम इच्छा

kangana ranaut writes a poem titled rakh shares video | मेरी राख गंगा में मत बहाना...! कंगना राणौतने शेअर केला व्हिडीओ, खूप होतोय व्हायरल

मेरी राख गंगा में मत बहाना...! कंगना राणौतने शेअर केला व्हिडीओ, खूप होतोय व्हायरल

ठळक मुद्देकंगना राणौतने नुकतेच ‘थलाइवी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता ती धाकड चित्रपटात दिसणार आहे.

कंगना राणौत केवळ तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत असते, असे म्हणत असाल तर चूक आहे. होय, कारण कंगना तिच्या कवितांमुळेही चर्चेत असते. सध्या तिची ‘राख’ ही कविता चांगली चर्चेत आहेत आणि सोशल मीडियावर या कवितेचा एक व्हिडीओ जबरदस्त व्हायरल होतोय.
लॉकडाऊनच्या काळात कंगना केवळ टिवटिव करण्यातच बिझी होती, असे नव्हे तर कविता लिहिण्यातही बिझी होती. ‘राख’ ही सुद्धा लॉकडाऊनमध्ये लिहिलेल्या कवितांपैकी एक.
कंगना अलीकडे तिच्या कुटुंबासोबत हायकिंगला गेली होती. यादरम्यानचे पहाडांवर घालवलेले क्षण आणि बॅकग्राऊंडमध्ये तिने लिहिलेल्या या कवितेच्या ओळी असा सुंदर व्हिडीओ तिने शेअर केला आहे. 

‘मेरी राख गंगा में मत बहाना। हर नदी सागर के साथ जाकर मिलती है। मुझे सागर की गहराइयों से डर लगता है। मैं आसमान को छूना चाहती हूं। मेरी राख को पहाड़ों पर बिखेर देना...’, असे कंगनाने लिहिलेल्या कवितेच्या ओळी आहेत.

यापूर्वी कंगनाने ‘आसमान’ नावाची कविता लिहिली होती. कंगना  एक उत्तम अभिनेत्री तर आहेच. पण एक उत्तम कवयित्री सुद्धा आहे, हेच तिच्या या कवितांवरून दिसतेय. सध्या चाहते तिचे कौतुक करताना थकत नाहीयेत.

‘धाकड’साठी सज्ज होतेय कंगना राणौत

कंगना राणौतने नुकतेच ‘थलाइवी’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. आता ती धाकड चित्रपटात दिसणार आहे आणि सध्या ती या चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ शेअर केला होता ज्यात ती धाकड चित्रपटासाठी फिजिकली तयार होताना दिसत होती.  नुकतेच तिने तिचा प्रोस्थेटिक मेजरमेंट सेशन पूर्ण केले.
या प्रोस्थेटिक सेशनदरम्यानचे फोटो कंगना राणौतने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोत कंगना तिच्या चेहºयावर प्रोस्थेटिक्स लावताना दिसत आहे. काही एक्सपर्टने यात तिची मदत केली आहे.   चित्रपटाच्या शूटिंगला जानेवारी महिन्यात सुरूवात केली जाणार आहे.

Web Title: kangana ranaut writes a poem titled rakh shares video