या अभिनेत्रीला आपण ओळखले का? लॉकडाऊनमध्ये रिअल लूक आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 01:03 PM2020-04-20T13:03:05+5:302020-04-20T13:03:35+5:30

या फोटोत अजिबात मेकमअप नसून ती अगदी सर्व सामान्य मुलींप्रमाणे घरात बागडताना दिसते.

Kangana Ranaut without makeup Look During LockDown-SRJ | या अभिनेत्रीला आपण ओळखले का? लॉकडाऊनमध्ये रिअल लूक आला समोर

या अभिनेत्रीला आपण ओळखले का? लॉकडाऊनमध्ये रिअल लूक आला समोर

googlenewsNext

बॉलीवुडची क्वीन म्हणजे कंगणा राणौत. सध्या लॉकडाऊनदरम्यान ती आपल्या कुटुंबासह मस्त क्वॉलिटी टाईम एन्जॉय करत आहे. कधी कुटुंबासह गेम खेळताना तर कधी किचनमध्ये रमताना ती दिसते. नेहमीच आपली हटके स्टाइल करत लक्ष वेधून घेणारी कंगणाने तिचे नवीन फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. या फोटोत अजिबात मेकमअप  नसून ती अगदी सर्व सामान्य मुलींप्रमाणे घरात बागडताना दिसते.  रिल लाइफमध्ये सुंदर दिसण्यासाठी काहीही करण्याची तयारी असलेली कंगणा प्रत्यक्ष जीवनात कशी असेल याची कल्पना तुम्ही नक्कीच केली असेल. 

रिल लाइफमध्ये ज्यारितीने सुंदर दिसतो तितकेच सुंदर आणि लक्षवेधी रिअल लाइफमध्येही दिसावं असा खटाटोप कंगणाचा असतो. त्यामुळे आपल्या स्टाईल, फॅशनबाबत ती बरीच सजग असते. मात्र आता रिकाम्या वेळात तिचा असा काहीसा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे.

तिचा हा नो मेकअप लूकही चाहत्यांच्या पसंतीस पात्र  ठरत आहे. तिच्या या फोटोंवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंटस देताना पाहायला मिळत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या ३३८ पोहोचली आहे. याशिवाय, २४ हजारहून अधिक लोकांना होम क्वारंटाइन केले आहे. देशात परिस्थिती अतिशय भयाण असून अनेकजण आपापल्यापरिने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

आता पर्यंत बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी पीएम केअर फंडला डोनेशन दिले आहे. आता यायादीत कंगना राणावतचे नावदेखील सामील झाले आहे. कंगनाने पीएम केअर फंडला 25 लाखांची मदत केली आहे. याचसोबत कंगनाची आई आशा राणावत यांनी देखील आपली महिन्याची पेन्शन पीएम फेअर फंडला दिली आहे. कंगनाची बहीण रंगोलीने याचा खुलासा केला आहे.
 

Web Title: Kangana Ranaut without makeup Look During LockDown-SRJ

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.