कंगना राणौतचा या खानसोबत होणार बॉक्स ऑफिसवर सामना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 17:09 IST2018-01-09T11:39:16+5:302018-01-09T17:09:16+5:30

2018 हे वर्षात अनेक चांगल्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर सामना होणार आहे. पहिल्याच महिन्यांत पद्मावत आणि पॅडमॅन हे चित्रपट एकाच ...

Kangana Ranaut will be with the Khan at the box office | कंगना राणौतचा या खानसोबत होणार बॉक्स ऑफिसवर सामना

कंगना राणौतचा या खानसोबत होणार बॉक्स ऑफिसवर सामना

2018
हे वर्षात अनेक चांगल्या चित्रपटांचा बॉक्स ऑफिसवर सामना होणार आहे. पहिल्याच महिन्यांत पद्मावत आणि पॅडमॅन हे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. त्यानंतर आता एप्रिल महिन्यांत बॉलिवूडची क्वीन कंगना राणौत आणि नवाब सैफ अली खान हे आमने सामने येणार आहेत. सैफ अली खानचा बाजार आणि कंगना राणौतचा  'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' हे चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. या आधी ही गत वर्षी कंगनाचा रंगून आणि सैफचा शेफ एकत्र रिलीज झाले होते आणि दोनही चित्रपट आपटले होते. चित्रपट  समीक्षक तरण आदर्शने ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरु आहे. 

या शुक्रवारी चित्रपटगृहात त्याचा कालाकांडी रिलीज होणार आहे. या चित्रपटात सैफ शिवाय कुणाल रॉय कपूर, विजय राज, अमायरा दस्तूर, दीपक डोबरियाल, अक्षय ओबरॉय, ईशा तलवार, नील भूपलम, शिवम पाटील सारखे कलाकार आहेत. या चित्रपटाद्वारे अक्षत वर्मा डायरेक्शन डेब्यू करतो आहे. हा एक  डार्क कॉमेडी थ्रीलर आहे. सैफ कॅन्सरने पीडित असल्याचे ट्रेलरमध्ये दिसते. सैफला पोटाचा कॅन्सर असल्याचे निदान होते. तुला आनंद मिळेल, त्या सगळ्या गोष्टी कर, असे डॉक्टर त्याला सांगतात. नंतर सैफ वेगवेगळ्या झोनमध्ये जातो, असे ट्रेलरमध्ये दिसते.  
गतवर्ष हे सैफ अली खानसाठी फारसं यशस्वी ठरलं नाही. त्यामुळे या वर्षी कंगना आणि सैफ दोघे ही एक हिट चित्रपटाची वाट बघतायेत. कंगनाला तिच्या 'माणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.  या चित्रपटात कंगना राणौत राणी लक्ष्मीबाईच्या भूमिकेत दिसणार आहे तर अंकिता लोखंडे यात राणी लक्ष्मीबाईची खास मैत्रिण झलकारी बाईची भूमिका साकारते आहे. अतुल कुलकर्णी तात्याराव टोपेंच्या भूमिकेत दिसेल तर वैभव तत्त्ववादी पूरण सिंह हे पात्र साकारणार आहे. पुरण सिंह हा राणी लक्ष्मीबाईच्या सैन्यातील एक भरवशाचा सरदार होता. राणीच्या रक्षणासाठी त्याने जीवाची बाजी लावली होती. वैभव हीच भूमिका साकारणार आहे. आपल्याला एप्रिल पर्यंतची वाट बघावी लागणार आहे की कोण-कोणावर भारी पडणार आहे. 

ALSO READ :  कंगना राणौत म्हणते, आयोजकांनी माझे अॅवॉर्ड सोहा अली खानला दिले


 

Web Title: Kangana Ranaut will be with the Khan at the box office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.