कंगना राणौतने केली 'या' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 17:13 IST2018-11-12T17:10:30+5:302018-11-12T17:13:45+5:30

कंगना रणौत 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या आगामी सिनेमाला घेऊन सतत चर्चेत आहे. त्यातच तिने पंगा सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे.

Kangana Ranaut stared this film shooting | कंगना राणौतने केली 'या' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

कंगना राणौतने केली 'या' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात

ठळक मुद्दे'पंगा' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहेया ती एका कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे

कंगना रणौत 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी' या आगामी सिनेमाला घेऊन सतत चर्चेत आहे.  नुकतेच तिने 'पंगा' सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. अश्विनी अय्यर तिवारी दिग्दर्शित सिनेमात कंगना मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच आम्ही तुम्हाला याआधीच सांगितले होते.   

 


अश्विनीने इन्स्टाग्रामवर सिनेमाच्या क्लॅपबोर्डचा फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे.  ‘पंगा’मध्ये कंगना राणौत एका कबड्डी खेळाडूच्या भूमिकेत दिसणार आहे. पण प्रोफेशनल खेळाडू दिसण्यासाठी तिला काही प्रशिक्षणाची गरज आहे. लवकरच कंगना यासाठीच्या प्रशिक्षणास सुरुवात करेल. याच काळात ती आपले १० किलो वजनही वाढवेल. सध्या कंगना हाय कॅलॅरी प्रोटीन डाएटवर आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंगना यात कॉलेजच्या मुलीपासून ते विवाहीत स्त्री आणि नंतर आईची भूमिका साकारताना दिसणार आहे. जर ही माहिती खरी ठरली तर कंगना पहिल्यांदा स्क्रिनवर आईची भूमिका साकारताना दिसेल. कंगनाशिवाय अभिनेत्री नीना गुप्ता आणि पंजाबी अभिनेता जस्सी गिल यात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. 


‘मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी’ या सिनेमासाठी कंगनाने १४ कोटी रूपये घेतले. आजपर्यंत कुठल्याही अभिनेत्रीने एका चित्रपटासाठी इतकी फी घेतली नाही. दीपिका पादुकोणने 'पद्मावत'मध्ये रणवीर सिंग आणि शाहिद कपूर यांच्यापेक्षा जास्त फी घेतली होती. दीपिकाचा रेकॉर्ड तोड सर्वाधिक फी आकारली आहे.   

Web Title: Kangana Ranaut stared this film shooting