सुमार कामगिरीचे कौतुक करणे थांबवा! कंगना राणौतने पुन्हा आलिया भटला डिवचले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 12:12 IST2019-04-12T11:52:14+5:302019-04-12T12:12:27+5:30

कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यात ‘मणिकर्णिका’च्या रिलीजपासून सुरु असलेला वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे आलिया कंगनाच्या प्रत्येक टीकेला अतिशय शांतपणे उत्तर देतेय. दुसरीकडे कंगना आलियाला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीये.

kangana ranaut slams alia bhatt acting in gully boy says dont compare me with her | सुमार कामगिरीचे कौतुक करणे थांबवा! कंगना राणौतने पुन्हा आलिया भटला डिवचले!

सुमार कामगिरीचे कौतुक करणे थांबवा! कंगना राणौतने पुन्हा आलिया भटला डिवचले!

ठळक मुद्देयापूर्वी आलिया संधीसाधू आहे, करण जोहरच्या हातातील कळसूत्री बाहुले आहे, असे काय काय कंगना म्हणाली होती.

कंगना राणौत आणि आलिया भट यांच्यात ‘मणिकर्णिका’च्या रिलीजपासून सुरु असलेला वाद थांबण्याची चिन्हे नाहीत. एकीकडे आलिया कंगनाच्या प्रत्येक टीकेला अतिशय शांतपणे उत्तर देतेय. दुसरीकडे कंगना आलियाला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीये. आता कंगनाने पुन्हा एकदा आलियाला डिवचले आहे.
एका संकेतस्थळाने घेतलेल्या ऑलाईन पोलनंतर हा वाद सुरु झाला. या पोलमध्ये २०१९ च्या सर्वोत्कृष्ट नायिकेच्या स्पर्धेत कंगनाने आलियावर मात केली. लोकांनी दिलेल्या मतांच्या आधारावर कंगना पहिल्या नंबरवर राहिली तर आलिया दुस-या क्रमांकावर आली. या पोलचा निकाल पाहून कंगनाला चेव चढला आणि ती आलियावर नव्याने बिथरली.

‘आलियासोबत माझी तुलना होणे ही माझ्यासाठी लाजीरवाणी बाब आहे. ‘गली बॉय’च्या तिच्या अभिनयात मला हरवण्यासारखे असे काय होते? पुन्हा एकदा तशीच फटकळ मुलीची भूमिका. मीडियाने ‘फिल्मी’ मुलांना त्यांच्या सुमार कामासाठी अति डोक्यावर घेतलेय. कृपया हे बंद करा. हेच सुरु राहिले तर दर्जेदार अभिनयाचा दर्जा कधीच सुधारणार नाही,’असे कंगना या पोलवर प्रतिक्रिया देताना म्हणाली.

यापूर्वी मिड डेला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने आलिया व रणबीर यांना युवा पिढीचा चेहरा म्हटले जात असल्यावर टीका केली होती. त्यांना युवा म्हणण्यात काय अर्थ आहे. रणबीर ३७ वर्षांचा आहे. आलिया २७ वर्षांची आहे. २७ व्या वयात माझी आई तीन मुलांची आई होती. हे चुकीचे आहे, असे कंगना म्हणाली होती. त्याआधी ‘मणिकर्णिका’ ला बॉलिवूडचा पाठींबा न मिळाल्याने कंगना संतापली होती आणि आलियावर तिने सर्वाधिक संताप व्यक्त केला होता. आलिया संधीसाधू आहे, करण जोहरच्या हातातील कळसूत्री बाहुले आहे, असे काय काय कंगना म्हणाली होती.

Web Title: kangana ranaut slams alia bhatt acting in gully boy says dont compare me with her