म्हणे, आमिर, आलिया मतलबी...! पुन्हा बिथरली कंगना राणौत!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 10:54 IST2019-02-05T10:54:17+5:302019-02-05T10:54:46+5:30

मणिकर्णिकाचे सहदिग्दर्शक क्रिश आणि कंगनातील आरोप-प्रत्यारोप अद्यापही थांबलेले नाहीत. पण आता हा वाद बॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचलाय.

/kangana ranaut slams aamir khan and alia bhatt in manikarnika controversy | म्हणे, आमिर, आलिया मतलबी...! पुन्हा बिथरली कंगना राणौत!!

म्हणे, आमिर, आलिया मतलबी...! पुन्हा बिथरली कंगना राणौत!!

ठळक मुद्दे ‘मणिकर्णिका’तील कंगनाच्या दिग्दर्शनाचे कौतुक होतेय. पण बॉलिवूडचे दिग्गज मात्र तिच्या या यशावर चकार शब्दही बोललेले नाहीत. नेमकी हीच बाब कंगनाला खटकली आहे.

कंगना राणौतचा ‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी’ या नुकत्याच रिलीज झालेल्या चित्रपटाने आत्तापर्यंत ७६.६५ कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारणाऱ्या कंगनावर कौतुकाचा वर्षाव होतोय. या चित्रपटाद्वारे कंगनाने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले आहे, त्याचीही चर्चा होतेय. पण याहीपेक्षा चर्चा आहे ती या चित्रपटाने निर्माण केलेल्या वादाची. होय, मणिकर्णिकाचे सहदिग्दर्शक क्रिश आणि कंगनातील आरोप-प्रत्यारोप अद्यापही थांबलेले नाहीत. पण आता हा वाद बॉलिवूडपर्यंत येऊन पोहोचलाय.


होय, पिंकविलाला दिलेल्या ताज्या मुलाखतीत कंगनाने बॉलिवूडच्या दिग्गज स्टार्सला लक्ष्य केले. आमिर खान,  ट्विंकल खन्ना आणि आलिया भट्टवर ती घसरली. संपूर्ण इंडस्ट्री माझ्याविरोधात एकत्र झालीय, असा आरोप तिने केले. ‘मणिकर्णिका’तील कंगनाच्या दिग्दर्शनाचे कौतुक होतेय. पण बॉलिवूडचे दिग्गज मात्र तिच्या या यशावर चकार शब्दही बोललेले नाहीत. नेमकी हीच बाब कंगनाला खटकली आहे. याच पार्श्वभूमीवर आमिर,  ट्विंकल, आलिया या सगळ्यांवर तिने निशाणा साधला.

‘इंडस्ट्रीने कायम माझ्याकडे दुर्लक्ष केलेय. माझ्या मुव्ही ट्रायलमध्ये कुणीही येत नाही. पण त्यांची वेळ येते तेव्हा लाजलज्जा सोडून मला फोन करतात आणि बोलवतात.अलीकडे मी सुद्धा त्यांच्या चित्रपटांच्या स्क्रिनिंगला जाणे सोडले आहे. आलियाने मला ‘राजी’चा ट्रेलर पाठवत, तो बघण्याची विनंती केली होती. हा ट्रेलर पाहिल्यानंतर मी मेघना गुलजार आणि आलिया दोघींनाही स्वत:हून फोन केला. पण माझ्या चित्रपटाबद्दल मात्र त्यांच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. आमिरनेही मला ‘दंगल’ आणि ‘सीक्रेट सुपरस्टार’साठी फोन केला होता. आमिर खान व  ट्विंकल खन्ना महिला सक्षमीकरणावर तासन् तास बोलतात. पण मणिकर्णिकासारखा ऐतिहासिक संदर्भ असलेल्या चित्रपटावर त्यांची साध्या एका ओळीचीही प्रतिक्रिया आली नाही. माझ्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी त्यांच्याजवळ वेळ नव्हता. हे सगळे लोक संधीसाधूू आहेत. हे सगळे माझ्याविरोधात कटकारस्थान रचतात,’असे कंगना म्हणाली.

Web Title: /kangana ranaut slams aamir khan and alia bhatt in manikarnika controversy