कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सांगितले त्या भयानक ॲसिड हल्ल्याविषयी, वाचून तुमच्या अंगावर उभे राहतील काटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 11:00 IST2019-10-03T10:46:38+5:302019-10-03T11:00:33+5:30

एकतर्फी प्रेमातून रंगोलीवर काही वर्षांपूर्वी ॲसिड हल्ला करण्यात आला होता.

kangana ranaut sister Rangoli Recalls The Horrifying Incident Of Acid Attack On Her | कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सांगितले त्या भयानक ॲसिड हल्ल्याविषयी, वाचून तुमच्या अंगावर उभे राहतील काटे

कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सांगितले त्या भयानक ॲसिड हल्ल्याविषयी, वाचून तुमच्या अंगावर उभे राहतील काटे

ठळक मुद्देमला एका मुलाने प्रपोज केले होते. मी नकार दिल्यानंतर त्या मुलाने एक लीटर ॲसिड माझ्या चेहऱ्यावर टाकले होते.गेल्या पाच वर्षांत माझ्यावर 54 सर्जरी झाल्या आहेत. पण आजही डॉक्टर माझा कान व्यवस्थित करू शकले नाहीत.

कंगना राणौत इतकीच तिची बहीण रंगोली देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर तर ती चांगलीच ॲक्टिव्ह असते. तिच्या बहिणाच्या संदर्भात अनेक ट्वीट ती नेहमीच सोशल मीडियावर करत असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. 



 

रंगोलीने तिच्या ट्विटरवर नुकताच एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या कॉलेज जीवनातील आहे. या फोटोत ती खूपच छान दिसत आहे. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, मी सायन्स स्टुडंट असल्याने मला कधी फोटो देखील काढायला वेळ मिळायचा नाही. पण कॉलेजच्या ॲन्युएल डे ला मी हा एक फोटो काढला होता. मी काही दिवसांपूर्वी माझ्या लहानपणीचा फोटो पोस्ट केला होता. त्यावेळी माझ्या अनेक फ्रेंड्सनी मला कॉलेजमधील फोटो पोस्ट करण्याविषयी सांगितले होते. माझ्याकडे केवळ हा एक फोटो मिळाला तो मी पोस्ट केला आहे.

या फोटोनंतर तिने एक ट्वीट करून त्यात लिहिले आहे की, हा फोटो मी काढल्यानंतर मला एका मुलाने प्रपोज केले होते. मी नकार दिल्यानंतर त्या मुलाने एक लीटर ॲसिड माझ्या चेहऱ्यावर टाकले होते. तसेच त्याने कंगनावर देखील हल्ला केला आणि तिला प्रचंड मारले होते. माझ्यावर हल्ला झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांत माझ्यावर 54 सर्जरी झाल्या आहेत. पण आजही डॉक्टर माझा कान व्यवस्थित करू शकले नाहीत. तुमच्या डोळ्यासमोर तुमचे अवयव ज्यावेळी विरघळतात, त्यावेळी तुम्ही सौंदर्याचा तुम्ही विचारच करणे सोडून देता.



 

रंगोली गेल्या अनेक वर्षांपासून कंगनासोबत मुंबईत राहात असून तिच्यासोबत ती काम करते. ती कंगनाची मॅनेजर असून कंगनाचे सगळे काम गेल्या अनेक वर्षांपासून तीच सांभाळत आहे. 



 

Web Title: kangana ranaut sister Rangoli Recalls The Horrifying Incident Of Acid Attack On Her