कंगना राणौतने नेपोटिझमवर बोलू नये; कारण ती सुद्धा नेपोटिझमचेच प्रॉडक्ट आहे!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2017 15:24 IST2017-09-14T09:54:51+5:302017-09-14T15:24:51+5:30
‘सिमरन’च्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या कंगना राणौतने एका पाठोपाठ एक अशा खळबळजनक मुलाखती देण्याचा जणू सपाटाच चालवला आहे. या मुलाखतीतून ...

कंगना राणौतने नेपोटिझमवर बोलू नये; कारण ती सुद्धा नेपोटिझमचेच प्रॉडक्ट आहे!!
‘ िमरन’च्या प्रमोशनमध्ये बिझी असलेल्या कंगना राणौतने एका पाठोपाठ एक अशा खळबळजनक मुलाखती देण्याचा जणू सपाटाच चालवला आहे. या मुलाखतीतून कंगनाने अनेकांशी उघड उघड वैर घेतले. ‘एक्स’ आदित्य पांचोली, हृतिक रोशनपासून तर करण जोहर सगळ्यांशीच. आता हृतिक तर कंगनाच्या या मुलाखतींवर अद्याप काही बोललेला नाही. पण आदित्यने मात्र कंगनाचा बरोबर वचपा काढला आहे. कंगना राणौत मोठ्या तो-यात नेपोटिझमवर (बॉलिवूडमधील घराणेशाही) बोलते. पण तिला यावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही. कारण ती स्वत: सुद्धा नेपोटिझमचेच प्रॉडक्ट आहे, असे आदित्यने म्हटले आहे.
होय, अलीकडे एका मुलाखतीत आदित्यने कंगनावर हा आरोप केला. कंगनाला नेपोटिझमविरोधात गळा काढण्याचा काहीही अधिकार नाही. कारण ती सुद्धा नेपोटिझममुळेच बॉलिवूडमध्ये आहे. होय, कारण मी इथे नसतो तर ती सुद्धा नसती. मी नसतो तर तिला महेश भट्टकडे कुणी पाठवले असते? मी जतीन कमपानीकडून तिचे फोटोशूट करवून घेतले नसते तर ती स्वत: ते कधीच करू शकली नसती. आॅडिशनसाठी ती कधी रांगेत उभी राहिलीय का? आयुष्यात तिने कधी आॅडिशन दिले आहे का? हे तिला विचारा. ती सांगते की, मी कॉफी अॅडचे आॅडिशन देत होते आणि त्या आॅडिशननंतर बाकी मुलींसोबत महेश भट्ट यांच्या आॅफिसमध्ये गेले. पण हे साफ खोटे आहे. तुम्ही महेश भट्ट यांना विचारून याची खात्री करू शकता.
मी होतो म्हणून कंगनाला ‘गँगस्टर’ मिळाला. मीच तिचे फोटो राजेश ग्रोवर नामक व्यक्तिकडे पाठवले होते. त्याने ते फोटो महेश भट्ट यांच्याकडे पाठवले. याच माणसाच्या माध्यमातून कंगना महेश भट्ट, मुकेश भट्ट आणि अनुराग बासू यांना भेटली, असा दावाही आदित्य पांचोलीने केला. आता आदित्यचे हे दावे खरे की कंगना म्हणते ते खरे, हे त्यांनाच ठाऊक. तूर्तास तरी कंगना आणि आदित्य पांचोली दोघेही जोरात आहे आणि त्यांना थांबवणे अशक्य आहे. आता या प्रकरणाचा सोक्षमोक्ष कसा आणि कधी लागतो, ते बघूच.