कंगना रणौतने शेअर केला ग्लॅमरस फोटो, फोटोसोबतच कॅप्शनही आहे अधिक इंटरेस्टींग....
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2020 12:31 IST2020-09-29T12:29:51+5:302020-09-29T12:31:14+5:30
कंगनाने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती फुलांमध्ये झोपलेली दिसत आहे. तर या फोटोला कंगनाने कॅप्शन दिलं की, "एक आग का दरिया है और डूब के जाना है."

कंगना रणौतने शेअर केला ग्लॅमरस फोटो, फोटोसोबतच कॅप्शनही आहे अधिक इंटरेस्टींग....
अभिनेत्री कंगना रणौतचं ऑफिस तोडल्याच्या प्रकरणावरून कंगना आणि बीएमसी आता कोर्टात आहे. कोर्टात संपूर्ण घटनाक्रम जाणून घेतला जात आहे. यादरम्यान कंगनाने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यात ती फुलांमध्ये झोपलेली दिसत आहे. तर या फोटोला कंगनाने कॅप्शन दिलं की, "एक आग का दरिया है और डूब के जाना है."
कंगना गेल्या काही दिवसांपासून अनेक वादग्रस्त ट्विट्स करत आहे. सोबत तिचे काही खास फोटोही शेअर करत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने फुलांसोबतच फोटो शेअर केला होता. ज्याच्या कॅप्शनला तिने लिहिले होते की, "फूलों के रंग से दिल की कलम से तुझको लिखी रोज पाती".
.... इक आग का दरिया है और डूब के जाना है ❤️... pic.twitter.com/L2cusMIPIS
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 29, 2020
दरम्यान, कंगना आणि बीएमसीतील कायदेशीर लढाईची तर या सर्व प्रकरणाची सुरूवात सुशांत सिंह राजपूतच्या मुद्द्यावरून कंगनाने शिवसेनेवर साधलेल्या निशाण्यापासून सुरू झाली होती. त्यानंतर कंगना अनेक वादग्रस्त विधान करू लागली होती. अशात बीएमसीने कंगनाच्या पाली हिलमधील ऑफिसच्या काही भागावर बुलडोजर चालवला होता.
आता हे प्रकरण कोर्टात सुरू आहे आणि नुकतेच कंगनाचे वकील बिरेंद्र सराफ यांनी कोर्टात कंगनाच्या तोडलेल्या ऑफिसचे फोटो दाखवले होते. तसेच खासदार संजय राऊत यांनी हरामखोर कुणाला म्हटलं हे त्यांना स्पष्ट करायचं आहे.