"अखेर हृतिकसारखा दिसणारा शोधलाच" कंगना रणौतसोबत दिसणारा 'मिस्ट्री मॅन' कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 10:22 AM2024-01-13T10:22:35+5:302024-01-13T10:24:01+5:30

'मिट्री मॅन'चा हात धरुन बाहेर पडताना दिसली कंगना रणौत

Kangana Ranaut seen with a mistry man fans saying he looks like hritik roshan | "अखेर हृतिकसारखा दिसणारा शोधलाच" कंगना रणौतसोबत दिसणारा 'मिस्ट्री मॅन' कोण?

"अखेर हृतिकसारखा दिसणारा शोधलाच" कंगना रणौतसोबत दिसणारा 'मिस्ट्री मॅन' कोण?

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) लग्न कधी करणार असा प्रश्न तिच्या चाहत्यांना नेहमीच पडतो. प्रोफेशनल आयुष्यात गेल्या काही वर्षांपासून कंगनाचे सर्वच चित्रपट आपटले. आता ती राजकारणात एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे नुकतंच तिला एका मिस्ट्री मॅनसोबत बघितलं गेलं. सलून सेशनमधून बाहेर पडताना त्यांचा एक फोटो व्हायरल होतोय. हा मिस्ट्री मॅन नेमका आहे तरी कोण?

कंगना रणौतचा मिस्ट्री मॅनसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर योगेन शाहने हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये कंगना एका हँडसम परदेशी व्यक्तीसोबत दिसत आहे. कंगनाने आकाशी रंगाचा वन पीस घातला आहे तर डोळ्यावर गॉगल लावला आहे. तर मिस्ट्री मॅन ब्लॅक आऊटफिटमध्ये हँडसम दिसतोय. दोघांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल आहे. इतकंच नाही तर दोघंही एकमेकांचा हात पकडून येताना दिसत आहेत. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

सध्या सोशल मीडियावर प्रत्येकजण 'कोण आहे हा?' असंच विचारताना दिसतोय. एकाने तर कमेंट करत लिहिले की,'हा तर हृतिक रोशनसारखाच दिसतोय','अखेर हृतिकसारखा दिसणारा शोधलाच' अशा कमेंट्स या फोटोवर आल्या आहेत. नेटकऱ्यांना मात्र दोघांची जोडी पसंतीस पडली आहे. 

कंगना रणौत आणि हृतिक रोशन यांचं अफेअर मध्यंतरी चर्चेत होतं.'क्रिश 4' च्या शूटिंगदरम्यान दोघंही प्रेमात पडले. नंतर त्यांच्यात काहीतरी बिनसलं आणि त्यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले. दोघांनी एकमेकांचे चॅटही व्हायरल केले होते. जावेद अख्तर यांच्यातील मध्यस्थीने त्यांच्यातील वाद मिटला.

Read in English

Web Title: Kangana Ranaut seen with a mistry man fans saying he looks like hritik roshan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.